Others News

आपल्याला माहित आहे कि,आधार कार्ड एक सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही प्रकारच्या योजनांचा फायदा किंवा कुठल्याही प्रकारचे सरकारी कामासाठी आता आधार कार्ड अनिवार्य आहे. आपल्याला माहित आहेच कि बँक खाते असो कि तुमचे मतदान कार्ड या सगळ्यांना आधार कार्ड संलग्न करणे आवश्यक आहे.

Updated on 28 August, 2022 3:59 PM IST

आपल्याला माहित आहे कि,आधार कार्ड एक सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही प्रकारच्या योजनांचा फायदा किंवा कुठल्याही प्रकारचे सरकारी कामासाठी आता आधार कार्ड अनिवार्य आहे. आपल्याला माहित आहेच कि बँक खाते असो कि तुमचे मतदान कार्ड या सगळ्यांना आधार कार्ड संलग्न करणे आवश्यक आहे.

या आधार कार्डच्या मार्फत बरीच कामे सोपी देखील होतात तो बर्‍याच प्रकारचे फायदे देखील लोकांना मिळतात. या लेखामध्ये आपण आधार कार्डमुळे पेन्शनधारकांना कुठला लाभ होतो याची माहिती घेऊ.

नक्की वाचा:कुक्कुटपालन करायचंय तर करा या कोंबडीचे आणि अशी घ्या काळजी मिळेल बक्कळ पैसा

 आधार कार्डमुळे पेन्शनधारकांना मिळणारे फायदे

1- डिजिटल लाइफ सर्टिफिकेट- पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांचा पेन्शनचा लाभ मिळत राहावा यासाठी पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे त्यांचे लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

परंतु आधार कार्डमुळे आता आधार आधारित जीवन प्रमाणपत्र सेवा आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे ऑनलाइन पद्धतीने सबमिट म्हणजेच सादर करायला मदत करते. ही सेवा प्रामुख्याने राज्य शासनाच्या व केंद्र सरकारच्या पेंशन धारकांसाठी आहे जी बायोमेट्रिक च्या माध्यमातून चालवली जाते.

नक्की वाचा:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या सणासुदीच्या मुहूर्तावर 29 ऑगस्टला मिळणार पगार

2- तुम्हाला वेळेवर पेमेंट मिळण्यास होते मदत-तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करताना सरकारी अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या गोष्टींची पडताळणी करावी लागते.

परंतु तुमचे आधार कार्ड जर तुमच्या पेन्शन खात्याशी संलग्न अर्थात लिंक असेल तर सरकारी अधिकाऱ्यांना पडताळणी करणे सोपे जाते व पेमेंट अगदी वेळेवर मिळण्यास मदत होते.

3- पीएफ क्लेम सेटलमेंट प्रक्रिया होते जलद- आपल्याला माहित आहेच कि जर आपल्याला पीएफ मधून काही रक्कम काढायची राहिली तर ते पैसे आपल्या खात्यावर यायला बराच अवधी लागतो.

परंतु जर तुमचे पीएफ खाते आधारशी लिंक असेल तर क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अगदी जलदपणे होते. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात यूएन नंबर अनिवार्यपणे आधार से लिंक करण्यास सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा ईपीएफ ऑनलाइन क्लेम करता येतो.

नक्की वाचा:Bussiness Tips: हातात एक रुपया नसताना 'या' पद्धतीचा वापर करून उभे करा भांडवल आणि सुरु करा व्यवसाय

English Summary: get some important advantage to pention holder from adhar card
Published on: 28 August 2022, 03:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)