Others News

सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे काही ठिकाणी समर सीझन सेल सुरू आहेत. असे सेल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सुरु असून या माध्यमातून तुम्ही कपडे वगैरे खरेदी करू शकतात.

Updated on 18 April, 2022 3:46 PM IST

सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे काही ठिकाणी समर सीझन सेल सुरू आहेत. असे सेल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सुरु असून  या माध्यमातून तुम्ही कपडे वगैरे खरेदी करू शकतात.

जर अशा ऑनलाईन  शॉपिंग ॲप्सच्या माध्यमातून तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही एसबीआय बँकेच्या माध्यमातून धमाकेदार ऑफर आणली आहे. जर तुम्ही बँकेच्या योनो अॅप च्या माध्यमातून ऑर्डर केली तर तुम्हाला घसघशीत सूट मिळणार आहे. याबाबतची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर दिली असून म्हटले आहे की, तुम्हाला टॉप फॅशन ब्रॅड्सवर  अनेक डिस्काउंट मिळतील. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी 70 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळत आहे.

नक्की वाचा:शेट्टींचे पवारांना रोखठोक बोल!! ऊस शेती आळशी शेतकऱ्यांची मग आपल्या नातवाचे इतके साखर कारखाने का?

 अशा पद्धतीने घ्या ऑफरचा लाभ

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर योनो ॲप डाऊनलोड करावे लागेल.

 हे ॲप तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील डाउनलोड करु शकता किंवा गूगल प्ले स्टोर वरून देखील डाऊनलोड करता येते. डाऊनलोड केल्या नंतर तुमचे मोबाईल नंबर द्वारे नोंदणी केली जाते व त्यानंतर तुम्हाला अँपमधूनच टायटन, लाईफस्टाईल, ट्रेंड्स, अजिओ, बिबा यासारख्या ब्रँड मधून खरेदी करू शकतात. यामध्ये ट्विटरद्वारे बँकेने म्हटले आहे की, योनो ॲपच्या माध्यमातून जे ग्राहक वेगवेगळ्या ब्रँडसाठी खरेदी करतात त्यांना ॲप वर उपलब्ध असलेल्या सर्व सवलतींचा स्वतंत्रपणे बचत करण्याची संधी दिली जाईल. एवढेच नाही तर ग्राहक एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे ॲप वर खरेदीसाठी पैसे देतात त्यांना स्वतंत्र सूट आणि रिवॉर्ड देखील दिली जाते.

नक्की वाचा:अबब…! आलिशान कारपेक्षा महाग आहे गजेंद्र रेडा; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क; काय आहेत याच्या विशेषता

 योनो ॲप द्वारे बँक ग्राहकांना अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देऊ करते. योनो अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना व्याजदर देखील माफ केली जातात तसेच  प्री अप्रूव कर्जाची सुविधा देखील आहे. एसबीआयने आता या ॲपचा उपयोग बँकिंग सेवेच्या व्यतिरिक्त खरेदीच्या सोयीसाठी देखील उघडले आहे.

English Summary: get seventy percent discount on shoping by sbi yono app
Published on: 18 April 2022, 03:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)