सध्या दिवाळी तोंडावर आली असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची एक अनोखी भेट दिली असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा दिवाळी सुरू होण्याअगोदर देण्यात येणार आहे. आपल्याला माहित आहेच की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी सुरू होत असून त्याआधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.
कोणत्या तारखेला मिळणार पगार
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक दिवाळीच्या निमित्ताने मोठा दिलासा दिला असून ऑक्टोबर महिन्याचा पगार हा दिवाळीपूर्वीच म्हणजेच 21 तारखेला देण्यात येणार आहे व त्या संबंधीचे आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आले आहेत. या आशयाची मागणी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केली होती व या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कोणाला मिळणार या निर्णयाचा फायदा?
राज्य सरकारने दिवाळीच्या निमित्ताने हा निर्णय घेऊन त्याचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचारी यांपासून ते शैक्षणिक संस्था,महाविद्यालय तसेच इतर सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असून 22 तारखे पासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या आधीच म्हणजेच 21 ऑक्टोबरला सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.
राज्य सरकारच्या कर्मचार्यांना मिळणार उत्सव अग्रीम रक्कम
राज्य शासनाच्या सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सवा अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मान्यता दिली असून त्यानुसार चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी याप्रमाणेच गट-क आणि गट-ब अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12500 रक्कम दिली जाणार असून दहा समान हप्त्यामध्ये परतफेडीची सवलत देण्यात आली आहे.
नक्की वाचा:पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या
Published on: 18 October 2022, 07:18 IST