Others News

सरकारच्या उजाला योजनेला सात वर्ष नुकतेच पूर्ण झाले.या योजनेच्या माध्यमातूनसर्वांना अगदी स्वस्त किमतीत एलईडी बल्ब उपलब्ध करूनदिले जातात.या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास प्रत्येक राज्यांमध्ये अगोदर असलेल्या पिवळ्या बल्ब च्या जागी स्वस्त दरातील एलईडी बल्ब वापरासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

Updated on 06 January, 2022 9:00 AM IST

 सरकारच्या उजाला योजनेला सात वर्ष नुकतेच पूर्ण झाले.या योजनेच्या माध्यमातूनसर्वांना अगदी स्वस्त किमतीत एलईडी बल्ब उपलब्ध करूनदिले जातात.या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास प्रत्येक राज्यांमध्ये अगोदर असलेल्या पिवळ्या बल्ब च्या जागी स्वस्त दरातील एलईडी बल्ब वापरासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

या योजनेचे विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लोकांना केवळ दहा रुपयात एलईडी बल्ब दिला जातो.ट्यूबलाइट आणि पंखीडा केली या योजनांतर्गत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिले जातात.

 या योजनेचे स्वरूप

 उद्याला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जानेवारी 2015 रोजी लॉन्च केली होती. या योजनेचे पूर्ण नाव उन्नत ज्योती बाय  अफोर्डेबल एलईडी फॉरऑलअसे आहे.अगोदर असलेल्या पिवळ्या बल्बच्या वापरामुळे विजेचा भरमसाठ वापर होत होता.त्यामध्ये विजेची बचत करण्यासाठी सरकारने एलईडी बल्ब वापराला प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम लॉन्च केला होता.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत36 कोटींपेक्षा अधिकएल इ डी लाईट चे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे वीज बिल कमी होण्यात फार मदत झाली आहे.ही योजना चालू करण्याच्या अगोदर एलईडी लाईट ची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये अशी होती. आता ही किंमत हळूहळू 70 ते 80 रुपयांवर आली आहे.नुसते एलईडीउपलब्ध करून देतात या माध्यमातून विजेत मोठ्या प्रमाणात बचत करण्याचेउद्दिष्ट देखील साध्य झाले आहे. 

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या बल्ब ची किंमत 70 रुपये असते परंतु ग्राहकांना हा बल्ब केवळ दहा रुपये मध्ये दिला जातो. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ट्यूबलाइट ची  किंमत दोनशे वीस रुपये आहे आणि फॅनची किंमत 1110 रुपये आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत रोजगार उपलब्ध होऊन असती हजार लोकांना नोकरीची संधी देखील उपलब्ध झाली आहे. एलईडी बल्ब डिस्ट्रीब्यूशन च्या माध्यमातून हा रोजगार उपलब्ध झाला आहे.

English Summary: get led bulb only ten ruoees through goverment ujala scheme
Published on: 06 January 2022, 09:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)