Others News

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे तिचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. यामागे सरकारची इच्छा आहे की, देशातील कुठल्याही शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दाराशी जाणार नाही व त्यांना अशा प्रकारची गरज पडणार नाही.

Updated on 12 February, 2021 11:19 AM IST

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे तिचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. यामागे सरकारची इच्छा आहे की, देशातील कुठल्याही शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दाराशी जाणार नाही व त्यांना अशा प्रकारची गरज पडणार नाही.

जर मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर, जवळजवळ दोन कोटी 24 लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे.त्या काळच्या मदतीने शेतकऱ्यांना शेती करणे सोपे झाले आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ 4 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. तसेच आपल्याला माहित आहे कि, पीएम किसान सम्मान निधि योजनेला केसीसी योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड लिंक केली गेली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार सन 2018 19 मध्ये 1,00,78,897 शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे. सरकारचं लक्ष्य  आहे की,  पी एम किसान योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांना केसची योजनेचा लाभ मिळावा. यासाठी विशेष प्रकारचे अभियानही चालवले जात आहे.

   कोणाला मिळू शकते किसान क्रेडिट कार्ड?

  • हे कार्ड शेतकरी, पशूपालन आणि मत्स्य पालन करणारा कोणताही व्यक्ती घेऊ शकतो.

  • जर कोणी दुसऱ्याची शेती करत असेल तर तो व्यक्ती या कार्डचा लाभ घेऊ शकतो.

 

वयमर्यादा

 किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय  कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त पंचात्तर वर्ष असावे. चल शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला एक को अॅपलिकँट लागतो.

आवश्यक कागदपत्रे

  • शेतीचे कागदपत्र जसे की सातबारा

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड चे फोटो कॉपी

  • कोणत्याही बँकेत कर्जदार नसल्याचे एफिडेविट

  • अर्जदाराचा फोटो

 

महत्त्वाचे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. अर्ज केल्यानंतर 14 दिवसाच्या आत मध्ये किसान क्रेडिट कार्ड द्यावे लागते.

English Summary: Get a Kisan Credit Card for free, find out what the age limit is
Published on: 12 February 2021, 11:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)