Others News

प्रधानमंत्री आवास योजना( शहरी) नुसार दुर्बल घटकांसाठी आणि लॉवर इन्कम ग्रुप यांच्यासाठी असलेल्या क्रेडिट लिंक सब्सिडी योजनेचा फायदा घेतला जाऊ शकतो. होम लोनचा असलेल्या व्याजदर दुर्बल घटकातील लोक २ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकता.

Updated on 11 January, 2021 7:04 PM IST

प्रधानमंत्री आवास योजना( शहरी) नुसार दुर्बल घटकांसाठी आणि लॉवर इन्कम ग्रुप यांच्यासाठी असलेल्या क्रेडिट लिंक सबसिडी योजनेचा फायदा घेतला जाऊ शकतो. होम लोनचा असलेल्या व्याजदर दुर्बल घटकातील लोक २ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकता.

 कॅटेगिरीच्या व्याख्या

 ज्या लोकांचे उत्पन्न वार्षिक ३ लाख रुपयापेक्षा कमी असते असे लोक ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येतात. ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले लोक एलआयजी कॅटेगरीमध्ये येतात. या दोन्ही कॅटेगरीतील लोकांना पीएमएवाय नुसार ६ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ६.५ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाला सबसिडी मिळू शकते.

 पीएम आवास योजनेचा फायदा

 मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणजे सन २०२२ पर्यंत सगळ्यांसाठी घरची सुरुवात सरकारने सी एलएसएस सुरू केली होती. नंतर या योजनेला वाढवून ६ लाख ते १२ लाख रुपये वार्षिक आणि १२ ते १८ लाख रुपये वार्षिक पर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांसाठी लागू करण्यात आली.

 कोणत्या कॅटेगिरीमध्ये किती लोन मिळते?

 १२ लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना एम आय जी-1 कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. तसेच या पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना एम आय जी 2 कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पहिली कॅटेगिरी मधील लोक ९ लाख रुपयांपर्यंतच्या होम लॉनवर व्याज मध्ये ४ टक्के आणि दुसरी कॅटेगिरी मध्य समाविष्ट असलेले लोक १२ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर ३ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाची सब्सिडीचा फायदा घेऊ शकतात. या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज घेतल्यावर बाकीच्या रकमेवर सामान्य दराने व्याज द्यावे लागते. प्रत्येक प्रकारच्या कर्जावर जास्तीत जास्तची समय सीमा २० वर्षांपर्यंत असते.

 

व्याजदरामधील फायदा

 पीएमएवाय मध्ये सरकारद्वारा उपलब्ध केल्या जाणाऱ्या सब्सिडीच्या रक्कमेला कर्जाच्या मुळ रकमेमधून वगळून उरलेल्या रकमेवर सामान्य दराने व्याज आकारले जाते. या योजनेद्वारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मासिक हप्ता २०१२ ते २३१८ रुपयांपर्यंत आणि व्याज पकडून द्यायची रक्कम ४ लाख २५ हजार ८६६ पासून ते ५ लाख ५६ हजार१०२  रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

 

किती होऊ शकतो फायदा?

 क्रेडिट लिंक सब्सिडी स्कीममध्ये मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १२ लाख त्यामध्ये आहे अशा लोकांना ९लाख रुपये २० वर्षाच्या कालावधी असलेल्या गृह कर्जावर ४ टक्के असलेली व्याज सब्सिडी मिळते.  बारा लाख ते १८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना ४ टक्क्यांपर्यंत व्याजावर सब्सिडी मिळते.

English Summary: Get a home loan subsidy from PM Awas Yojana, find out how to benefit
Published on: 11 January 2021, 07:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)