सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना आहेत. सरकारने आपल्याला माहित आहेच कि अलीकडेच सुकन्या समृद्धी योजना तसेच भविष्य निर्वाह निधी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांच्यासह अनेक लहान बचत योजनांसाठी व्याजदर जाहीर केले आहेत.
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी सरकारने कुठल्याही प्रकारच्या व्याजदरांमध्ये बदल केलेला नाही. परंतु तरीसुद्धा या लहान बचत योजनांचे व्याजाचे दर हे बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा आजही जास्त आहेत.
यामध्येच अशीच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात एससीएसएसएक विशेष बचत योजना आहे. या योजनेबद्दल या लेखात माहिती घेऊ.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
एक ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेली विशेष बचत योजना असून यामध्ये साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणतेही भारतीय व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. याचा अर्थ60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या भारतीयांसाठी ही योजना असून वय हे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे.
जे लोक स्वेच्छानिवृत्ती घेऊन नोकरीतून रिटायर झाले आहेत, असे व्यक्ती देखील या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेचा व्याज दराचा विचार केला तर तो 7.4 टक्के आहे.
नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, घरबसल्या मिळतील 30 हजार
या योजनेची वैशिष्ट्ये
1- एखादी व्यक्ती कमीत कमी एक हजार रुपये जमा करून ज्येष्ठ नागरिक बचत खाते उघडू शकते आणि यामध्ये जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये रक्कम जमा करता येते.
2- व्याजदर 7.4 टक्के असून जो सर्वात जास्त आहे. या व्याजदर मासिक आधारावर आहे ज्याची गणना 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी केली जाते.
3- ज्येष्ठ नागरिक बचत खात्यात जास्त रक्कम जमा केल्यास जास्तीची रक्कम त्वरित परत केली जाईल.
4- या योजनेच्या अंतर्गत मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षे आहे परंतु ती आणखी तीन वर्ष पर्यंत वाढवता येऊ शकते.
5- या योजनेतील गुंतवणूक इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 च्या कलम 80c च्या फायद्यासाठी वैद्य आहे. परंतु योजनेच्या खात्यावर मिळालेले एकूण व्याज एका आर्थिक वर्षात पन्नास हजार पेक्षा जास्त असल्यास ते व्याज करपात्र असते. कलम 80 सी अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक कर सूट मिळू शकते.
6- खातेदाराचा जर मृत्यू झाला तर ज्येष्ठ नागरिक बचत खात्याला मृत्यूच्या तारखेपासून सामान्य बचत खात्याच्या दराने व्याज मिळेल.
Published on: 04 July 2022, 09:51 IST