अनेकजण गुंतवणूकीचे पर्याय शोधत असतात. मात्र सध्याच्या काळात कशात गुंतवणूक करायची याचा नेमका अंदाज कोणाला नसतो. तसेच विश्वास देखील नसतो. असे असताना
देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या LIC ने ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक पॉलिसी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. यामुळे तुम्ही देखील यामध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
सध्याच्या पालकांच्या आर्थिक नियोजनामध्ये मुलांच्या भविष्याचाही विचार केला जातो आहे. मुलांसाठी भविष्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून आताच त्यांना आर्थिक मदत मिळेल, अशी सोय अनेक पालक करत असतात. अनेक लोकं मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करतात. मुलांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन LIC कडून एक योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला इतर पर्याय शोधायची गरज लागणार नाही.
LIC च्या या नवीन योजनेचे नाव आहे New Children's Money Back Plan. ही पॉलिसी घेण्यासाठीचे किमान वय 0 वर्षे आहे. ही पॉलिसी घेण्यासाठीचे जास्तीत जास्त वय 12 वर्षे आहे. त्याची किमान विमा रक्कम रु 10,000 आहे. जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तसेच LIC च्या New Children's Money Back योजनेची एकूण मुदत 25 वर्षे आहे.
शेवटची संधी!! एवढ्या स्वस्तात मिळत आहे बार-सिमेंट-विटा, घर बांधताना पैशांची होणार बचत..
यामध्ये LIC कडून बेसिक सम इंश्योर्डच्या 20-20 टक्के रक्कम 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 व्य वर्षी मुलाला दिली जाईल. राहिलेली उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाईल. यासह, सर्व थकित बोनस देखील दिले जातील. यामुळे यामध्ये तुमचा चांगला फायदा आहे. तसेच जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर निहित साध्या प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस व्यतिरिक्त विमा रक्कम दिली जाते.
आता सरपंच पुन्हा जनतेतून? नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता
यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-NEW-CHILDREN-S-MONEY-BACK-PLAN-(2) या वेबसाईटवर भेट देऊन सर्व माहिती घेऊ शकता. यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही याठिकाणी पैसे गुंतवणूक करू शकता.
महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
पंजाबचे मुख्यमंत्री भागवंत मान उद्या विवाहबंधनात अडकणार
Published on: 08 July 2022, 11:34 IST