Others News

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील! गौतमी पाटील हे नाव सध्या खूप चर्चेत आहे. Lavni Dancer अशी ओळख गौतमी पाटील निर्माण केली आहे. तिच्या नावाच्या चर्चाच सर्वदूर सुरु आहे. याच गौतमी पाटीलचा चित्रपट येतोय! पाहता पाहता गौतमी सोशल (Gautami patil instagram) मीडिया स्टार म्हणून प्रसिद्धीझोतात आली.

Updated on 03 January, 2023 1:45 PM IST

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील! गौतमी पाटील हे नाव सध्या खूप चर्चेत आहे. Lavni Dancer अशी ओळख गौतमी पाटील निर्माण केली आहे. तिच्या नावाच्या चर्चाच सर्वदूर सुरु आहे. याच गौतमी पाटीलचा चित्रपट येतोय! पाहता पाहता गौतमी सोशल (Gautami patil instagram) मीडिया स्टार म्हणून प्रसिद्धीझोतात आली.

गौतमीचा चित्रपट येतोय?

कालपर्वापर्यंत कोण कुठली गौतमी अनेकांना ठाऊकही नव्हती. पण, एका व्हायरल व्हिडीओनं तिला द्यायची ती प्रसिद्धी दिलीच. आता तर म्हणे ती चित्रपटातूनही झळकणार आहे. विविध कार्यक्रमांना दिसणारी ही सुंदरा आता मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळं तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आकाशाचा रंग निळा का आहे? यामागील विज्ञान काय सांगते ते जाणून घ्या

आगामी चित्रपटाचं नाव काय?

गौतमीच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'घुंगरु'. सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपी (Hampi) इतकंच नव्हे तर पार परदेशात थायलंडमध्ये तिच्या या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पडलं आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनही केल्याचं कळत आहे.

चित्रपटातून ती नेमकी कोणासोबत झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असतानाच आता त्याचाही उलगडा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खुद्द बाबा गायकवाडच गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. एका लोकप्रिय मराठी मालिकेतून गायकवाड झळकले होते. कलेसोबतच राजकारण आणि समाजकारणाची त्यांना आवड. पण, आता गौतमीसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारही झळकणार आहेत. कलावंत आणि त्यातही लोककलावंतांच्या आयष्यावर कटाक्ष टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का, यावरच आता अनेकांचं लक्ष आहे.

English Summary: Gautami Patil: Gautami Patil is the best! Will appear in this first film
Published on: 03 January 2023, 01:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)