शनिवारी 3 सप्टेंबर रोजी पहिल्या दिवशी लोकांनी मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना केली. यावर्षी राज्यभरात जेष्ठा गौरीचा (jeshtha gouri) सण पार पडला. आता गौरीला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज तिसऱ्या दिवशी गौरींच विसर्जन केले जाणार आहे.
पुजेत (pooja) ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैव्यद्य दाखवण्यात आला. त्यानंतर करण्यात येणार आहे. जाणून घेऊया ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा (gouri visarjan) शुभ मुहूर्त आणि विधी.
तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. यावर्षी सोमवारी 5 सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे. आज आपण विसर्जनचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उडीदाचे भाव तेजीत, आता सरकारही करणार उडिदाची खरेदी
गौरी विसर्जन
शुभ मुहूर्त : सकाळी 06:01 ते 06:38 पर्यंत आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा एकूण कालावधी: 12 तास 37 मिनिटे
पोस्ट ऑफिससोबत सुरू करा 'हा' व्यवसाय; छोट्या गुंतवणुकीत मिळणार चांगला नफा
गौरी विसर्जन पूजा विधी
ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी 5 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर (shubh muhurt) गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते.
त्यानंतर मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना (gouri) निरोप दिला जातो. त्याआधीत घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात.
यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध भागात हा उत्सव (celebration) वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या
दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर
आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय
जनावरांचे दूध वाढविण्यासाठी 'हे' घरगुती उपाय आवश्यक
Published on: 05 September 2022, 11:02 IST