Others News

Business Idea :- नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला अशी म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे प्रत्येकाला चांगल्या दर्जाची आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याची शाश्वती जवळजवळ शून्यात जमा आहे. त्यामुळे आपला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभारून तो व्यवसाय वाढवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. व्यवसायांची निवड करताना तो कायम चालणारा आणि फक्त एकदा गुंतवणूक केली तर आयुष्यभर आपल्याला पैसा देईल असा व्यवसायाची निवड आपल्याला खूप महत्त्वाचे ठरू शकते.

Updated on 16 August, 2023 10:43 AM IST

Business Idea :- नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला अशी म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे प्रत्येकाला चांगल्या दर्जाची आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याची शाश्वती जवळजवळ शून्यात जमा आहे.

त्यामुळे आपला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभारून तो व्यवसाय वाढवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. व्यवसायांची निवड करताना तो कायम चालणारा आणि फक्त एकदा गुंतवणूक केली तर आयुष्यभर आपल्याला पैसा देईल असा व्यवसायाची निवड आपल्याला खूप महत्त्वाचे ठरू शकते.

व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत परंतु त्यातील नेमका व्यवसायाची निवड करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर पैसा देऊ शकेल एवढेच नव्हे तर तुमची पुढची पिढी सुद्धा या व्यवसायात चांगल्या प्रकारे स्थिर होऊ शकते अशा व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

 गॅस एजन्सीचा व्यवसाय

 गॅस एजन्सीचा व्यवसाय हा खूप फायदेशीर व्यवसाय असून याकरिता लागणारे आवश्यक नियम आणि अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे परंतु पैशांची समस्या आहे.

तर काळजी करण्याची गरज नसून केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. या व्यवसायाची सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले  एखाद्या गॅस एजन्सी कडून डिस्ट्रीब्यूटरशिप घेणे गरजेचे आहे. यामध्ये गॅस डिस्ट्रीब्यूटरचे चार प्रकार पडतात ते म्हणजे शहरी,ग्रामीण, ग्रामीण आणि हार्ड टू रिच क्षेत्रिय वितरक असे हे चार प्रकार असतात.

त्यामुळे तुम्हाला जर हा व्यवसाय उभारायचा असेल तर नेमकी एजन्सी तुम्हाला कोणत्या ठिकाणी टाकायची आहे? ते ठिकाण नेमके कोणत्या ठिकाणी येते याची तुम्हाला माहिती असणे गरजेचे असून त्या आधारे तुम्हाला एजन्सीचा परवाना मिळतो.

 गॅस एजन्सी व्यवसाय सुरू करण्याकरिता असलेल्या महत्त्वाच्या अटी

 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला गॅस एजन्सीचा व्यवसाय उभारायचा असेल तर किमान वय 21 ते कमाल साठ वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराने मान्यता प्राप्त बोर्डातून किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असून कुटुंबातील कोणताही सदस्य तेल विपणन कंपनीचा कर्मचारी नसणे देखील तितकेच आवश्यक आहे. तुम्हाला जर याकरता अर्ज करायचा असेल तर दहा हजार रुपयांचे शुल्क याकरिता लागते व पंधरा लाख रुपयांचे भांडवल तुमच्याकडे आवश्यक गोदाम आणि एजन्सीचे ऑफिस बांधण्याकरिता असणे गरजेचे आहे.

 साधारणपणे असलेली प्रक्रिया

यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस डिस्ट्रीब्यूटर साठी अर्ज करावा लागणार आहे. या तीनही सरकारी कंपन्या असून या कंपन्या डिस्ट्रीब्यूटरशिपचे वितरण करत असतात. त्यावेळी या कंपन्यांना डिस्ट्रीब्यूटरशिपचे वितरण करायचे असते तेव्हा ते वृत्तपत्रे आणि इतर माध्यमातून जाहिरात देतात. त्यामुळे जेव्हा या कंपन्यांच्या माध्यमातून या संबंधीची अधिसूचना जारी करण्यात येते त्यावेळी तुम्ही अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.

 परवाना मिळवण्याकरिता काय कराल?

याकरिता तुम्हाला https://www.lpgvitrakchyan.in/ वर नोंदणी करणे गरजेचे असून त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाइल क्रिएट करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित अर्जदारांची मुलाखत कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येते व जर ही मुलाखत अर्जदार उत्तीर्ण झाला तर  तुम्ही नमूद केलेली सर्व माहिती व्हेरिफाय केली जाते

व सर्व प्रकारच्या आवश्यक चौकशा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पत्र देण्यात येते. हे सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्हाला ज्या कंपनीची डिस्ट्रीब्यूटर शिप घ्यायची आहे त्या कंपनीमध्ये तुम्हाला सिक्युरिटी म्हणून काही रक्कम जमा करावी लागणार असून त्यानंतरच तुमच्या नावावर गॅस एजन्सी देण्यात येते.

English Summary: gas agency business is so profitable business in whole life
Published on: 16 August 2023, 10:43 IST