Others News

देशामध्ये आजपासून 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. यामध्ये एअरटेलने वाराणसीमध्ये आणि जिओनी अहमदाबादमधील एका गावात या सेवेची सुरुवात केली. या लेखात आपण 5G इंटरनेट सर्विस चे फायदे काय होतील हे जाणून घेऊ.

Updated on 01 October, 2022 12:31 PM IST

देशामध्ये आजपासून 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. यामध्ये एअरटेलने वाराणसीमध्ये आणि जिओनी अहमदाबादमधील एका गावात या सेवेची सुरुवात केली. या लेखात आपण 5G इंटरनेट सर्विस चे फायदे काय होतील हे जाणून घेऊ

नक्की वाचा:ड्रोनच्या सहाय्याने तरुणांना कृषी प्रशिक्षण,DGCA कडून गरुड एरोस्पेसला मान्यता

5G सुरु केल्याने मिळणारे फायदे

1- सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आता इंटरनेट वापरकर्त्यांना जलद गतीने इंटरनेट अनुभवायला मिळणार आहे.

2- व्हिडिओ गेमिंगच्या क्षेत्रामध्ये या सेवेचे आगमन झाल्यामुळे मोठा बदल होणार आहे.

3- व्हिडिओ बफरिंग किंवा न थांबता आता प्रवाहित करण्यात सक्षम असतील.

4- इंटरनेट कॉलिंग मध्ये आवाज स्पष्ट येईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉज येणार नाही.

5- 2 जीबीचा मूवी दहा ते वीस सेकंदात डाऊनलोड करता येईल.

6- शेती क्षेत्रामध्ये देखरेखीखाली ड्रोनचा वापर आता शक्य होणार आहे.

7- मेट्रो आणि चालक विरहित वाहने चालविणे सोपे होणार आहे.

8- वर्चुअल रियालिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोटस वापरणे शक्य होईल.

नक्की वाचा:भारतात धवलक्रांतीचा पहिला टप्पा पार तर दुसऱ्या टप्यात दूध प्रकिया अपूर्ण, वाचा सविस्तर

9-5G इंटरनेट सेवा भारतात सुरू झाल्यामुळे आता बरेच गोष्टी बदलणार असून यामुळे लोकांचे काम खुप सोपे होणार आहे. मनोरंजन आणि दळणवळणाच्या क्षेत्रात देखील खूप बदल होईल.

 काय आहे नेमकी 5G सेवा?

 इंटरनेटवरच्या पाचव्या पिढीला 5G म्हणतात. एक वायरलेस ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा असून लहरींद्वारे हायस्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते.

यामध्ये तीन प्रकारचे फ्रिक्वेन्सी बँड असतात. यामध्ये पहिला आहे कमी फ्रिक्वेन्सी बँड, दुसरा आहे मध्यम फ्रिक्वेन्सी बँड आणि तिसरा उच्च वारंवारता बँड असून यामध्ये इंटरनेटचा वेग 20 जीबीपीएस असणार असून सिग्नलच्या बाबतीत देखील चांगले राहणार आहे.

नक्की वाचा:नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरात वाढ, मात्र केळीच्या तुटवड्याने व्यापारी वर्ग चिंतेत

English Summary: from today 5G service launch so get so many benifit to this service
Published on: 01 October 2022, 12:27 IST