शेतकरी वर्गाला केवळ शेतीमालाच आधार असतो. जे की याविरुद्ध कोणतेही साधन नसते ना की कोणती पेन्शन. राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्या न कोणत्या योजना काढत असते जे की शेतकऱ्यांचा आर्थिकरित्या विकास व्हावा यासाठी सरकारने पीएम किसान मानधन योजना देखील सुरू केली. या योजनेमध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या ६० वयानंतर महिन्याला या योजनेतून ३ हजार रुपये पेन्शन देखील भेटणार आहे म्हणजे की वर्षाला ३६ हजार रुपये भेटतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा भरवसा राहत नाही त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूप धारण केले आहे.
पेन्शन मिळणार पण या आहेत अटी-नियम :-
पीएम किसान मानधन योजनामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांला भाग घेता येतो जे की शेतकऱ्याला वयाच्या ६० वर्षानंतर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये भेटणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याना प्रीमियम अदा करावा लागणार आहे. पीएम किसान मानधन योजना अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याचे वय १८ - ४० दरम्यान असावे तसेच या योजनेला प्रतिमहा ५५ - २०० रुपये जमा करावे लागणार आहेत. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला महिन्याला ३ हजार रुपये भेटणार आहेत.
काय आहे सरकारचा उद्देश?
शेतकऱ्यांकडे शेतीच्या उत्पानदशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो तसेच वृद्ध वयात शेतकऱ्यांचे हाल होतात त्यामुळे या मानधन योजनेतून शेतकऱ्यांना वृद्ध वयात आधार मिळणार आहे. केंद्र सरकारने ही जी योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय १८-४० असावे. वयाचा दाखला, उमेदवार शेतकरी हा गरीब व अल्पभूधारक असणे तसेच त्या शेतकऱ्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा :-
शेतकऱ्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागणार आहे. लागणारी सर्व कागदपत्रे तसेच बँक खात्याची माहिती द्यावी. तुमचे आधार कार्ड त्या अर्जाशी जोडले जाईल त्यानंतर तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल. नंतर तुम्ही कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जावे आणि स्वतःची या योजनेसाठी नोंद करावी.
Published on: 07 February 2022, 06:41 IST