Others News

मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Updated on 04 September, 2022 4:53 PM IST

मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने अपघात झाला होता. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोण आहेत सायरस मिस्त्री? Who is Cyrus Mistry?

मुंबईत पारसी कुटुंबात सायरस मिस्त्री यांचा जन्म झाला. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस (London Business) स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.

सायसर मिस्त्री हे 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले. वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होत.

English Summary: Former Tata Group Chairman Cyrus Mistry dies on the spot in a car accident
Published on: 04 September 2022, 04:53 IST