Others News

"मेहनत आपली, झीज आपली, पण नुकसान कोण भरून देणार?" पाऊस वेळेवर पडतोच असं नाही, वादळ, गारपीट, कीड, रोग हे तर आजच्या शेतीचे रोजचे संकट झालंय. अशा वेळी शेतकऱ्याला आधार देणारा एकच उपाय – पीक विमा!

Updated on 16 July, 2025 12:46 PM IST

प्रस्तावना-

"मेहनत आपली, झीज आपली, पण नुकसान कोण भरून देणार?"

पाऊस वेळेवर पडतोच असं नाही, वादळ, गारपीट, कीड, रोग हे तर आजच्या शेतीचे रोजचे संकट झालंय. अशा वेळी शेतकऱ्याला आधार देणारा एकच उपाय – पीक विमा!

पीक विमा म्हणजे काय?

पीक विमा हा शेतकऱ्याच्या पिकाचं संरक्षण करणारा सुरक्षा कवच आहे.

पाऊस कमी झाला, वादळामुळे नुकसान झालं, कीड लागली, उत्पादन कमी आलं – अशा सगळ्या परिस्थितीत सरकार किंवा विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळते.

पीक विमा का घ्यावा?

निसर्गाच्या अनिश्चिततेपासून संरक्षण

आर्थिक धोका कमी होतो

नुकसान झाल्यावर पुन्हा शेती सुरू करण्यासाठी मदत मिळते

कर्जबाजारीपणापासून थोडीफार सुटका

सरकारकडून सबसिडी – कमी प्रीमियमात जास्त सुरक्षा!

महत्वाची सूचना!

पीक विमा भरण्याची शेवटची तारीख: 31 जुलै

उशीर झाला, तर विमा मिळणार नाही. त्यामुळे आजच नजीकच्या बँकेत, सेवा केंद्रात किंवा ऑनलाईन अर्ज करा!

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं...

शेतात पेरलेलं बीज देवाच्या हवाली करताय,

पण विमा हे बीज सरकारच्या मदतीचं आहे…

ते पेरा, ते फळ देईल- संकटात तुमचं बळ बनेल!

आजच पीक विमा घ्या- आपलं पीक, आपलं भविष्य वाचवा! नुकसान टाळणं आपल्या हातात नाही, पण त्यातून सावरायला विमा नक्कीच मदत करतो!

लेखक- नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)

English Summary: For farmers - why is crop insurance necessary?
Published on: 16 July 2025, 12:45 IST