Others News

एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते.

Updated on 24 July, 2022 4:25 PM IST

एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. 

खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे.Fungus is a different organism. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात.अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. 

यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. 

बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.

 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान 

English Summary: First understand what is fungus?
Published on: 24 July 2022, 04:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)