Others News

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत पुढील हप्त्यांचे पैसे सरकारकडून लवकरच बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Updated on 16 April, 2021 2:56 PM IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत पुढील हप्त्यांचे पैसे सरकारकडून लवकरच बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या योजनेत पात्र होण्यासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल तर आपल्या खात्यात  दोन हजार  रुपये मिळतील की नाही ते त्वरित तपासा. दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेचा घोटाळा झाला होता. प्रत्येक राज्यात बनावट शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाली असून बनावट शेतकऱ्यांना या योजनेतून बाद करत आहे. दरम्यान तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल का याचा ते तपासून पाहा..पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेशी संबंधित 11 कोटी 74 लाख लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहेत.

कोणाला मिळणार लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करत असेल परंतु शेती त्याच्या नावावर नसून त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. दहा हजार रुपयांहून अधिक पेन्शन मिळवणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार / मंत्री / महापौर यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.

 

तुमचं स्टेटस कसं तपासाल?

प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे तर त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करु शकता.

सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

तेथे उजव्या बाजूला ‘Farmers Corner’चा पर्याय दिसेल

त्यासोबतच ‘Beneficiary Status’या पर्यायावर क्लिक करा.

मग नवीन पेज ओपन होईल.

नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाइल नंबर यापैकी एक पर्याय निवडा.

या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तपासू शकता.

तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.

त्यानंतर ‘Get Data’ या पर्यायावर क्लिक करा.

मग तुम्हाला सर्व व्यवहारांची संपूर्ण माहिती मिळेल.

म्हणजेच कुठल्या बँक खात्यात पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत.

सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त

 

8वा हप्ता कधीपर्यंत मिळेल?

या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत मिळतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो. मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली.

English Summary: Find out if you will get PM Kisan Yojana money or not
Published on: 16 April 2021, 02:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)