हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.१. अंजनी:- फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर.२.आंबा :-फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, ३) टोई किंवा तुईया, ४) कुटुक, ५) कुटुर्गा, ६) टकाचोर, ७) शिपाई बुलबुल, ८) लालबुड्या बुलबुल, ९) तांबट. घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) हळद्या, २) शिक्रा, ३) सुभग, ४) तुरुमति ससाणा, ५) कोतवाल, ६) सातभाई, नाचण, ८) पतंगा किंवा स्वर्गीय नर्तक, ९) काळटोप कस्तूर, १०) छोटा कुहवा, ११) गावकावळा, १२) डोमकावळा, १३) भुऱ्या गरूड.ढोलीसाठी वापर करणारे पक्षी - १) पिंगळा, २) दयाळ, ३)जंगली मैना, ४) भांगपाडी मैना.
लपण्यासाठी डहाळ्यांचा वापर करणारे पक्षी -१) पिंगळा.दिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पानांचे टाळे वापरणारे पक्षी - १) साळुंकी, २) कोकीळ, ३) गावकावळा, ४) डोमकावळा, ५) हळद्या, ६) जंगली मैना.दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) कबरा वनघुबड किंवा धनगर.३ .असाणा :- फळ खाणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुंकी, ५) राखी धनेश, ६) भोरडी, ७) हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) मलबारचा राखी धनेश, १०) कुर्टूक, ११) कुटुर्गा, १२) जंगली मैना, १३) हरोळी, १४) तुरेवाला वल्गुली, १५) तांबट, १६) पवेई मैना.४ .अंजीर :-फळ खाणारे पक्षी - १) राखी धनेश, २) कोकीळ, ३) कीर पोपट, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) हळद्या, ९) तांबट, १०) फूलटोचा, ११) रेषाळ फूलटोचा, १२) जंगली मैना, १३) गावकावळा, १४) डोमकावळा.
५ .अडुळसा :-फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर ३) चश्मेवाला, ४) चिमणा शिंजीर. ६.उंबर :-फळ खाणारे पक्षी - १) तांबट, २) कुर्टक, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ, ६) हळद्या, ७) राखी धनेश, ८) काळटोप कस्तूर, ९) टकाचोर, १०) कुटुर्गा, ११) काळा बुलबुल, १२) हरोळी, १३) कवडा धनेश, १४) हळदी बुलबुल, १५) बुरखा हळद्या, १६) सह्याद्री हरोळी किंवा जाकीटवाली हरोळी, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा, १९) भांगपाडी मैना, २०) साळुंकी, २१) पवेई मैना, २२) वायेरा किंवा मलबारी धनेश.पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) सुभग २) नाचण ३) नीलांग, ४) तुरेवाला वल्गुली, ५) शिंपी, ६) राखी वल्गुली, ७)राखी वटवट्या.घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा.दिनथाऱ्यासाठी वापर करणारे पक्षी - १) हळद्या, २) बुरखा हळद्या, ३) कोतवाल, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) रानखाटीक, ७) डोमकावळा, ८) दयाळ, १) भोरडी, १०) तांबट, ११) कुटुक, १२) कुटुर्गा, १३) भारद्वाज, १४) स्वर्गीय नर्तक, १५) कोकिळ, १६) पावशा, १७) गावकावळा. १८) श्रृंगी घुबड
७. काटेसावर :-फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर,२) जांभळा शिंजीर,३) भोरडी, ४) हळद्या, ५) तांबट, ६) गावकावळा, ७) डोमकावळा, ८) लालबुड्या बुलबुल,९) शिपाई बुलबुल, १०) बुरखा हळद्या,११) शृंगराज,१२) पांढरपोट्या कोतवाल,१३) रानचिमणी,१४) सातभाई,१५) राखी वल्गुली,१६) तुरेवाला वल्गुली, १७) कवड्या सुतार, १८) सोनपाठी सुतार,१९) साळुंकी, २०) जंगली मैना,२१) कोतवाल,२२) करडा कोतवाल किंवा हिवाळी कोतवाल २३) टकाचोर, २४) भांगपाडी मैना, २५) कीर पोपट, २६) राखी धनेश, २७) कुटुर्गा, २८) रानभाई अबलख मैना किंवा कवडी मैना, ३०) लोटनचा सूर्यपक्षी, ३१) चिमणा शिंजीर, ३२) मिलिंद, ३३) रान वटवट्या, ३४) काळा बुलबुल, ३५) पहाडी पोपट किंवा शिकंदर पोपट, ३६) काळटोप कस्तूर,३७) टोई किंवा तुईया, ३८) नीलपंखी पोपट,३९) रेषाळ फूलटोचा, ४०) चीय किंवा पिचू पोपट, ४१) कंठेरी वटवट्या, ४२) हरेवा किंवा पत्रगुप्त, ४३) पवेई मैना, ४४) सारिका ४५) हरोळी, ४६) केशराज, ४७) छोटा भुंगराज, ४८) श्वेतकंठी सातभाई किंवा पिंगट पोटाचा सातभाई. पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)वेडा राघू .घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) गावकावळा, २) डोमकावळा, ३) कवड्या सुतार, ४) तांबट, ५) सोनपाठी सुतार, ६) चिमणा सुतार, ७) काळा शराटी, ८) कांडेसर, ९) शेंडीपाकोळी.{टीप : या झाडावर सुमारे ५० पेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. वृक्षारोपणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुष्पवृक्ष म्हणजे 'ओपन-एअर-ज्यूस - बार', पक्ष्यांसाठी जणू पक्षिनिरीक्षकांसाठी जणू काही मेजवानी असते.}
Published on: 29 June 2022, 03:41 IST