Others News

केंद्र सरकारकडून अनेक योजना लागू केल्या जात आहेत. याचा फायदा अनेकांना होत आहे. आता जन धन खाते असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जन धन खाते असणाऱ्या लोकांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.

Updated on 17 March, 2022 12:42 PM IST

केंद्र सरकारकडून अनेक योजना लागू केल्या जात आहेत. याचा फायदा अनेकांना होत आहे. आता जन धन खाते असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जन धन खाते असणाऱ्या लोकांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत. एका योजनेअंतर्गत हे पैसे खातेधारकांना मिळणार आहेत. 'पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना' असे या योजनेचे नाव आहे. यामुळे आता याचा लाभ अनेक नागरिक घेणार आहेत. या योजनेअंतर्गत मोदी सरकार दर महिन्याला ३ हजार रुपये जन धन खाते धारकांना देणार आहे.

याबाबत माहिती अशी की, जन धन खाते धारकांना पेन्शनच्या स्वरूपात हे पैसे मिळणार आहेत. या योजनेमध्ये १८ ते ४० वर्षापर्यंतचा कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जातात. एका वर्षात ३६ हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. यामुळे उतार वयासाठी पैसे उपयोगी येणार आहेत.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. असंघटित क्षेत्रात स्ट्रीट व्हेंडर, हेड लोडर, वीटभट्टी कामगार आणि रिक्षाचालक इत्यादी कामगार येतात. यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, या लोकांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे.

यासाठी तुमच्याकडे जन धन खाते असायला हवे. जन धन खाते नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे यासाठी आधारकार्ड देखील आवश्यक आहे. तसेच तुम्हाला बँकेत बचत खात्याची माहिती द्यावी लागेल. वेगवेगळ्या वयोगटानुसार कामगारांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपये भरावे लागणार आहेत. याबाबत बँकेत सविस्तर माहिती मिळणार आहे.

English Summary: Finally the news came !! Modi government's big announcement for Jandhan account holders, will get money every month ..
Published on: 17 March 2022, 12:42 IST