Others News

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे.

Updated on 13 July, 2023 8:06 AM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे.

सलग तीन दिवस तीन रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाती वाटपाची चर्चा सुरू होती. पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता.

एक तर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता. तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही माथापच्ची सुरू होती. हा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल संध्याकाळी दिल्ली गाठली.

काय आहे 4-4-2 फॉर्म्युला?

4-4-2 फार्म्युल्यानुसार भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रिपद मिळणार असून राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.

दरम्यान, दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. काही आमदार गावाला आहेत. ते जर संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊ शकले तर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांना आधीच मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. पण त्यांना खाती देण्यात आलेली नाही. या खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यांना आजच खाती दिली जाण्याची शक्यता आहे. किंवा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर नव्या मंत्र्यांसह सर्वांची खाते वाटप केले जाऊ शकते, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

English Summary: Finally, the cabinet expansion is over! The formula was decided
Published on: 13 July 2023, 08:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)