Others News

आसाम पोलिसात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या जुनमोनी राभा यांनी फसवणुकीच्या आरोपांसाठी आपल्याच प्रियकराला तुरुंगात टाकलं आहे.

Updated on 07 May, 2022 3:42 PM IST

आसाम पोलिसात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या जुनमोनी राभा यांनी फसवणुकीच्या आरोपांसाठी आपल्याच प्रियकराला तुरुंगात टाकलं आहे. जुनमोनी राभा नौगाव पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी आहे, असं भासवणाऱ्या प्रियकर राणा पोगागविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

नौगाव पोलिसांनी प्रियकर राणाला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवलं आहे. काही महिन्यांपूर्वी जुनमोनी यांनी सत्ताधारी भाजप पक्षाच्या नेत्याला फोनवर खणखणीत प्रत्युत्तर दिलं होतं. तेव्हापासून त्या चर्चेत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जुनमोनी आणि राणा यांचा साखरपुडा झाला. यंदा नोव्हेंबरमध्ये या दोघांचं लग्न होणार होतं.

जुनमोनी यांना साखरपुड्यानंतर लगेचच राणा अफरातफर करणारा तोतया व्यक्ती असल्याचं समजलं होतं. नौगाव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राणा याने जुनमोनी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीदरम्यान स्वत: ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.

साखरपुड्यानंतर जुनमोनी यांनी अशा काही गोष्टी आढळल्या ज्यामुळे त्यांचा प्रियकरावरचा विश्वास उडाला. राणाने नोकरी देण्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचंही स्पष्ट झालं. यासंदर्भात जुनमोनी यांनी तपास सुरू केला तेव्हा हा माणूस अनेक अफरातफरीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं

जुनमोनी तेव्हा माजुली इथल्या पोलीस स्थानकात कार्यरत होत्या. तेव्हा गेल्या वर्षी जानेवारीत या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. घरच्यांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने दोघांचा साखरपुडा झाला.

जुनमोनी यांनी सांगितलं की, माजुलीत काम करताना आमची ओळख झाली. आमच्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यानेच ओळख करून दिली होती. राणाची पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आणि उठबस होती. कदाचित तेही त्या प्रकरणात सामील असतील.

जुनमोनी सांगतात, राणाने ओएनजीसीचा जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत ग्रामीण विकासाचं काम बघत आहेत. मीसुद्धा कॉटन कॉलेजातून जनसंपर्क आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे प्रभावित झाल्याचे ते सांगतात.

महत्वाच्या बातम्या
असा कसा हा आडमुठेपणा! लिलाव झाला तरी कांदा घेण्यास व्यापाऱ्याची टंगळमंगळ; अखेर शेतकऱ्याने केली कंप्लेंट अन 
दुर्मिळ माहिती:पानवेलच्या 'या' जातींची लागवड करा आणि मिळवा 9 ते 15 वर्षांपर्यंत पैसा

English Summary: Female police officers; A female officer who imprisoned her future husband
Published on: 07 May 2022, 03:42 IST