Others News

आता सोनं लवकरच 55 हजाराचा आकडा गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. यामुळे अनेकांची सोन खरेदी करण्यासाठीची लगबल सुरु आहे. सोन्याची किंमत (Gold Rate Today) शुक्रवारी वाढली आहे. सोनं 250 पेक्षा जास्त रुपयांनी महागले आहे.

Updated on 23 April, 2022 12:37 PM IST

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत अनेकदा चढउतार होत आहेत. असे असताना आता सोनं लवकरच 55 हजाराचा आकडा गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. यामुळे अनेकांची सोन खरेदी करण्यासाठीची लगबल सुरु आहे. सोन्याची किंमत (Gold Rate Today) शुक्रवारी वाढली आहे. सोनं 250 पेक्षा जास्त रुपयांनी महागले आहे.

दिल्लीमध्ये सोन्याची किमत प्रति 10 ग्राम 52 हजार 472 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी सोन्याची किंमती प्रति 10 ग्रॅम 52209 रुपये इतकी नोंदवण्यात आली होती. सोन्यासोबत चांदीही महागली आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्या किमती अजूनच वाढण्याची शक्यता आहे. चांदीच्या किंमती (Silver Rate Today) पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजाराच्या घरात गेला आहे.

सध्याच्या घडीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यातील तेजीचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही जाणवत आहे. वाढत्या सोने चांदीच्या दरांचा फटका ऐन लग्नसराईत होण्याचीही दाट शक्यता आहे. यामुळे सध्या अनेकांनी लग्न जमण्याआधीच सोन खरेदी करण्याकडे अनेकांचा जास्त कल आहे. सध्या बाजारात सोन खरेदी करण्यासाठी अनेकांची गर्दी दिसून येत आहे.

आज सोन प्रति दहा ग्रॅम 52 हजार 472 रुपये तर चांदीचे आजचे दर प्रति किलो 67 हजार 707 रुपये आहेत. मुंबईत सोन्याची किंमत ही 52610 रुपये इतकी आहे. सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच यामागे रशिया आणि युक्रेनमधील वाद असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 55 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तसेच या वर्षात सोन ६० हजारांपेक्षा वर जाण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद हा अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे खरेदी करताना अनेकांना पुढे किमती वाढणार की कमी होणार याबाबत संभ्रम आहे. असे असले तरी बाजारात सोन खरेदी करण्यासाठी गर्दी कायम आहे.

महत्वाच्या बातम्या;
Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..
आपत्कालीन संकटांपासून कसे कराल पिकांचे संरक्षण? शेडनेटमधील शेती म्हणजे काय ?
गरिबांचे कोल्डड्रिंक महागले! सर्वसामान्यांना दुष्काळात तेरावा महिना

English Summary: Fear of gold hitting record highs soon? Gold rose on Friday
Published on: 23 April 2022, 12:37 IST