Others News

शेतकरी मित्रांनो बदलत्या काळानुसार क्षेत्रात देखील अमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे ठरते. देशात दिवसेंदिवस महागाई आकाशाला गवसणी मारू पाहत आहे. त्यामुळे फक्त शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागवणे खूपच कठीण काम बनले आहे. म्हणून शेती समवेतच काही शेती पूरक व्यवसाय करण्याची गरज आता निर्माण होताना दिसत आहे. अनेक शेतकरी मित्रांना शेती पूरक व्यवसाय करण्याची आवड असते अनेक लोक शेती पूरक व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असतात मात्र त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.

Updated on 10 January, 2022 9:48 PM IST

शेतकरी मित्रांनो बदलत्या काळानुसार क्षेत्रात देखील अमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे ठरते. देशात दिवसेंदिवस महागाई आकाशाला गवसणी मारू पाहत आहे. त्यामुळे फक्त शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागवणे खूपच कठीण काम बनले आहे. म्हणून शेती समवेतच काही शेती पूरक व्यवसाय करण्याची गरज आता निर्माण होताना दिसत आहे. अनेक शेतकरी मित्रांना शेती पूरक व्यवसाय करण्याची आवड असते अनेक लोक शेती पूरक व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असतात मात्र त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.

म्हणून आज आम्ही शेतकरी मित्रांना सोयीचे व्हावे म्हणून आज एका शेतीपूरक व्यवसायाची भन्नाट कल्पना घेऊन हजर झालो आहोत. शेतकरी मित्रांनो हा शेतीपूरक व्यवसायकमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू केला जाऊ शकतो तसेच या व्यवसायासाठी सरकार सबसिडी देखील देते. या व्यवसायासाठी जर आपल्याकडे भांडवल नसेल तर बँकेकडून लोन देखील प्राप्त केले जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो आपण हा व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पर्ल फार्मिंगचा हा व्यवसाय शेतीसाठी एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो. अलीकडे पर्ल फॉर्मिंग मध्ये अनेक शेतकऱ्यांची आवड वाढत चालली आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधव हा व्यवसाय सुरू करत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पर्ल फार्मिंग विषयी काही महत्त्वाच्या बाबी.

शेतकरी मित्रांनो फार्मिंग चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे तीन गोष्टींचे असणे आवश्यक आहे. मित्रांनो आपल्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक शेततळ्याची आवश्यकता असणार आहे, तसेच या व्यवसायासाठी शिंपल्याची आवश्‍यकता भासणार आहे. शेतकरी मित्रांनो या सोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्याआधी आपणास या व्यवसायासंबंधी ट्रेनिंग घेणे गरजेचे असणार आहे ट्रेनिंग विना हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकत नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे शेततळे असणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे शेततळे नसेल तर यासाठी शेततळे बनवावे लागेल. आपणास या व्यवसायासाठी लागणारे सिंपले कुठेही सहजरित्या भेटू शकतात. तसेच आपण ज्या ठिकाणी ट्रेनिंग घ्याल तिथे सुद्धा सिंपले आपणास सहजरीत्या उपलब्ध होऊन जातात. शेतकरी मित्रांनो याची ट्रेनिंग देशात अनेक ठिकाणी दिली जाते मात्र एमपीचे होशंगाबाद व आपल्या राज्यातील मुंबई येथे याचे प्रशिक्षण चांगले दिले जाते.

मोती तयार करण्यासाठी शिंपले एका जाळ्यात बांधून दहा ते पंधरा दिवस शेततळ्यात ठेवले जाते. सिंपले शेततळ्यात ठेवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेततळ्याचे वातावरण त्यांच्यासाठी सूटेबल झाले पाहिजे म्हणून शिंपले शेततळ्यात टाकले जातात. त्यानंतर सिंपले बाहेर काढले जातात त्यांची सर्जरी केली जाते या सर्जरीमध्ये शिंपल्याच्या आत मोतीचा साचा प्लांट केला जातो. या साच्याच्या वर कोटिंग केली जाते व सीप लेयर बनवला जातो. याच शिंपल्यात नंतर मोती बनतो. मोती तयार करण्यासाठी एक सिंपले तयार करण्यासाठी 35 रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो, आणि एका शिंपल्यातून दोन मोती तयार केले जाऊ शकतात. आपण जर यांच्या किमतीचा विचार केला तर तयार झालेले मोती 200 रुपयांपर्यंत विकले जातात. जर तयार केलेल्या मोतीची क्वालिटी ही उत्तम असेल तर हे मोती 200 रुपयांपेक्षाही अधिक दरात विकले जाऊ शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याद्वारे देखील मदत मिळू शकते.

शेतकरी मित्रांनो जर आपण एक एकरच्या शेततळ्यात मोतीची शेती करण्याचा विचार करत असाल तर आपणास आठ लाख रुपये पर्यंत खर्च येणे अपेक्षित आहे. आपणास एक एकरच्या शेततळ्यात जवळपास 25 हजार सिंपले टाकावे लागतील. यातील काही सिंपले खराब देखील होतात तरी देखील 60% सिंपले चांगले निघतील, जर एक मोती ची किंमत 120 रुपये भेटली तर त्यातून वर्षाकाठी तीस लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते.

English Summary: farmers start pearl farming business and earn more profit learn more about it
Published on: 10 January 2022, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)