Others News

शेतात काम करतांना शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेवून कार्यवाही करावी.

Updated on 29 August, 2020 4:24 PM IST


शेतात काम करतांना शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या कुटुंबियांना  तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेवून कार्यवाही करावी.  गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज वनामती येथील आढावा बैठकीत सांगितले.

दरम्यान,  कृषी विभागातील कृषी सहायकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलिकडे जावून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या कालावधीतही कृषी विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण रानभाज्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल कृषीमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात,वीज पडणे,पूर,सर्पदंश,विंचूदंश,विजेचा शॉक बसने इत्यादी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणार अपघात, रस्त्यावरील अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे.  सन २०१५-१६ मध्ये सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची काय आहे पात्रता 

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण. 

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा मिळत असतो. शेतातील अपघाती मृत्यूनंतर विमाधारकांच्या घरच्यांना रक्कम मिळत असते.

या योजनेअंतर्गत कोणते संरक्षण मिळते ?

१) अपघाती मृत्यू. : २ लाखाचे संरक्षण

२) अपघातात एक हात अथवा पाय आणि दोन डोळे  निकामी होणे : २ लाखांचे विमा संरक्षण

३) अपघातात एक डोळा किंवा एक हात अथवा पाय  निकामी होणे. : १ लाखाचे विमा संरक्षण.

English Summary: Farmers should take more advantage of Gopinath Munde Accident Insurance Scheme - Agriculture Minister
Published on: 29 August 2020, 04:23 IST