सध्या शेतीचा खरीब हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांना उधारीवर खते किंवा विविध कामे करावी लागतता. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शेतकऱ्यांना सिंचन संचाची दुरुस्ती करण्यास अडचणी येतात. यामुळे सिंचन संच स्वत जवळ असतानाही शेतीसाठी उपयोग करता येत नसल्याने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत संचाची दुरुस्ती शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे.
केंद्र सरकारने ठिंबक सिंचन योजना राबविण्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघडून देणे आवश्यक आहे.
पुरवठा केलेल्या संचासाठी संबंघित शेतकऱ्याला तीन वर्षापर्यत मोफत सर्व्हिसिंग सेवा देणे आवश्यक आहे. सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार बदलावयाच्या साहित्याची किंमत आकारुन तो पार्ट बदलून देणे आवश्यक आहे. सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कंपनीला ही सेवा देणे बंधनकारक केले आहे. या पंधरावड्यात शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबर सूक्ष्म सिंचनासह तांत्रिक माहिती देणे त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. कौशल्याधारिक कामे करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते आहे.
काय आहे प्रधानमंत्री सिंचन योजना
शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ या समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.
Published on: 20 August 2020, 06:53 IST