Others News

आज कृषी आधुनिकरण झाली आहे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना प्रगत आणि प्रमाणित बियाणे भेटत नाहीत. दरम्यान बियाणे चांगले मिळावे,यासाठी केंद्र सरकारने बीज ग्राम कार्यक्रम योजना आणलेली आहे.

Updated on 17 February, 2021 11:07 AM IST

आज कृषी आधुनिकरण झाली आहे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना प्रगत आणि प्रमाणित बियाणे भेटत नाहीत. दरम्यान बियाणे चांगले मिळावे,यासाठी केंद्र सरकारने बीज ग्राम कार्यक्रम योजना आणलेली आहे.

 या योजनेच्या अंतर्गत ग्राम पंचायत पातळीवर बियाणे प्रक्रियेसह बियाणे भंडार गोदामांची स्थापना, राष्ट्रीय बियाणे रिझर्व्ह, खासगी क्षेत्रात बियाणे उत्पादनाला प्रोत्साहन आणि गुणवत्ता नियंत्रण  पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाद्वारे देशातील उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी दर्जेदार बियाणे उत्पादन व पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करणे.

 

दरम्यान ही योजना २०१४-१५ पासून लागू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत ४.२१ लाख बीज ग्राम तयार करण्यात आले आहेत.यात देशातील १७०.८६ लाख शेतकऱ्यांना परडवणाऱ्या किंमतींमध्ये ३८.१ लाख क्किंटल प्रमाणित बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.आपण आज याच योजनेविषयी माहिती घेणार आहोत...

काय आहे ग्राम बीज योजना -

२ ते३ तीन गावे मिळून एक ग्रुप तयार केला जातो. त्या गावातील शेतकरी आपले गट तयार केली जातात.शेतकऱ्यांचा हा गट ५० ते १०० शेतकऱ्यांचा असतो. याशिवाय यांच्याकडे ०.१ हेक्टर जमिनीत वेगवेगळे पिकांची प्रगत जातींचे बियाणे तयार केली जातात. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी ते काढणी पर्यंत आरएसएससी द्वारे प्रशिक्षण दिले जाते. बियाणे उत्पादन केल्याने उत्पन्न वाढविण्यास मदत मिळत असते. 

बीज ग्राम योजनेच्या अंतर्गत  शेतकऱ्यांना बी उत्पादन करण्यासाठी  आणि लागवडीसाठी २५ते ५० टक्के अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना ५० टक्के इतर शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदान दिले जाते. यासह बीज उत्पादनासाठी खाद्य, औषधे, आणि कृषी यंत्रांवरही राज्य सरकार अनुदान देत असते.

English Summary: Farmers get high quality seeds from this scheme, find out what is the scheme
Published on: 17 February 2021, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)