मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या शेत मजुराच्या कन्या असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा रविवारी १५ मे रोजी औरंगाबाद येथे थाटामाटात पार पडला. पल्लवी जाधव यांनी अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत.
पल्लवी जाधव सतत मुलींना आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक चाहते आहेत. दबंग महिला अधिकारी म्हणूनही पोलीस प्रशासनात त्यांची ओळख आहे. पल्लवीचे आई-वडील दोघेही शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यांनी ते पूर्णही केले.
पल्लवीला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. त्यामुळे नोकरी करत असतानाच तिने आपला छंद जोपासण्यासाठी मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने जयपूरमध्ये २०२० ग्लॅमन मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. कमवा आणि शिका योजनेवर काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ती अनेकदा आई-वडिलांसोबत कामावर जायची.
पल्लवी सांगतात, मॉडेलिंग करणं त्यांच्या छंद आहे, आणि आपल्या मोकळ्या वेळात तो पूर्ण करायचा त्या प्रयत्न करतात.सध्या पल्लवी एका चित्रपटातही काम करत आहे, अर्थातच या क्षेत्रात पूर्णवेळ येण्याचा कोणताही विचार नाही. "मी आयुष्यभर पोलीस राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होईन." असे पल्लवी सांगतात.
"पल्लवी यांनी मानसशास्त्रात एमए केले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकारी व्हायचे ठरवले. हा गणवेश मिळवण्यासाठी मी खूप संघर्ष केला असल्याचे पल्लवी सांगतात. मी ३ वर्षे अथक परिश्रम केले आहेत. मला हा गणवेश कोणाच्याही मदतीने किंवा उपकाराने मिळालेला नाही. शेवटचे प्रेम म्हणजे वर्दी, "असे त्या जोरदारपणे उत्तर देतात. त्यांना भविष्यात पोलीस उपअधीक्षक व्हायचे आहे अस त्या सांगतात.
महत्वाच्या बातम्या
21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
Published on: 19 May 2022, 01:23 IST