1 फेब्रुवारी हा दिवस देशातल्या शेतकऱ्यांसाठी खासकरुण महत्वाचा म्हणावा लागेल. केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री. पीयूष गोयल यांनी लोकसभेत देशाच्या 2018-19 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प पेश केला. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची नजर ह्या वर्षीच्या बजेट होती. येणाऱ्या आर्थिक वर्षात कुणासाठी काय असेल याची उत्त्सुकता सर्वच करीत होती. ह्या अर्थसंल्पाला विषेश महत्व ह्या साठी दिले जात आहे कारण कि हे मोदी सरकारचे हे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला याची प्रस्थावना करण्यात आली आणि सर्व स्थरावर जोरदार प्रतीक्षा करण्यात आली.
भारताची 60% जनसंख्या अजुनसुधा कृषी क्षेत्रवार निर्भून आहे. 17% देशाचे उत्पन हे कृषी क्षेत्रापासून होते. जनसंख्येचा बाबतीत विश्वातल्या दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात आपला शेतकरी हा लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो. ह्याच कारणांमुळे कृषी क्षेत्राचे देशाच्या आर्थिक बजेट मध्ये विशेष महत्व प्राप्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढावे ह्या धोरणावर आधारित कृषी क्षेत्रावर केंद्रित असलेले हे बजेट असून या द्वारा एक नवा पाया उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अर्थमंत्र्यांनी प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना घोषित केली. ह्या योजनेद्वारे 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येतील. ह्या योजनेचा फायदा 12 करोड शेतकयांना होणार असून ह्यासाठी 75,000 करोड रुपये प्रस्थावित करण्यात आले आहेत. ह्या योजनेद्वारे शेतकरी गरजेच्या वेळी पैसे वापरू शकतात.
देशाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ह्या बजेटची स्तुती केली असून. यंदाचा बजेट कृषी क्षेत्राला नवी दिशा देणार आणि युवकांना शेतीकडे आकर्षित करणारा ठरेल असे मत त्यानी बजेट वरील प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कृषीला व्यवसायिकता देण्याचे त्यानी कौतुक केले. महत्वाचा पैलू असा कि कर्जमाफी हा परिपूर्ण मार्ग नसून प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ह्या सारख्या योजना कृषी व्यवसायाला चालना देवू शकतील. ह्या व्यतिरिक्त पशुपालन आणि मत्स्यपालन व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारा कर्ज घेतलेल्या आणि वेळेवर कर्ज रक्कम फेडीत असलेल्या शेतकऱ्यांना 2%ची सुठ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार ह्या वर्षी पाऊस ऋतु चांगला असेल, गेल्या वर्षा सारखी दुष्काळजन्य परिस्थितिचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही. निसर्ग आणि योग्य असे पूरक शासकीय धोरण असणारे हे वर्ष भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा देवू शकेल. आणि कृषी हा पुनः आपले गत वैभव प्राप्त करेल अशी अपेक्षा आपन करू शकतो. बजेट किती चांगले की वाइट हा एक चर्चेचा विषय असू शकतो.
ह्या लेखात व्यक्त केलेले विचार हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत.
अमोल नाकवे
9717174766
nakveamol1@gmail.com
Published on: 02 March 2019, 03:01 IST