शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरू केली. सरकारची ही योजना इतर योजनेच्या तुलनेने खूप लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंत १० लाख कोटी शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. विशेष सरकार या योजनेत नेहमी बदल घडवून आणत शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देत आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देत असते. हे पैसे तीन हप्त्यात दिले जातात, हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने बळीराजाला त्याचा पैसा थेट मिळतो.
सरकारने आधी ही योजना अल्पभूधारकांसाठी आखली होती परंतु आता हा नियम रद्द करण्यात आला आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रे़डिट कार्डचाही लाभ त्वरीत मिळतो. पुढील महिन्याच्या एक तारखेला या योजनेचा एक हप्ता येणार ाहे. दरम्यान सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. पण पैसा नक्की शेतकऱ्याकडे जातो का? शेतकरी या पैशाचा वापर कशा करतो, कुठे खर्च करतो.
याविषयी माहिती आपणा कोणाकडे नाही. या प्रश्नांचे उत्तर इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च आणि इंटरनेशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टिट्युट यांनी दिले आहे. या संस्थेने याविषयी एक सर्व्हे केला असून यात एक मोठा खुलासा झाला आहे. भऱ्याच वेळा सरकारी योजनांचा पैसा हा योग्य ठिकाणी खर्च होत नाही. दहा जणांपैकी साधरण ५ ते ६ जण हा पैसा इतर कामासाठी वापरत असतात. पीएम किसान योजनेतील पैसा ही असाच खर्च होतो का या प्रश्नाचे उत्तर या सर्व्हेतून काढण्यात आले आहे. अंदाज लावण्यात येत होता की, शेतकरी या योजनेचा पैसा शेतीच्या गरजा पुर्ण करण्यासाठी खर्च करेल. संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कृषी विज्ञान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आपला पैसा अवजारांवर आणि बियाणे आणि खतांवर पैसा खर्च करतात.
अभ्यासानुसार, पहिला हप्ता ५२ टक्के शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित कामांसाठी खर्च केला. तर २६ टक्के शेतकऱ्यांनी ७ टक्के उपभोग्य वस्तूंवर खर्च केला. शिक्षण आणि आरोग्यावर ७ टक्के शेतकऱ्यांनी , तर १५ टक्के शेतकऱ्यांनी सण आणि लग्न समारंभासाठी हा पैसा खर्च केला. जेव्हा शेतीच्या कामांचा हंगाम नव्हता तेव्हा ६० टक्के शेतकऱ्यांनी पीएम किसान सम्मान योजनेचा पैसा शिक्षण, आरोग्य आणि उपगोग्य वस्तूंवर खर्च केला आहे. परंतु जेव्हा कामांचा हंगाम आला तेव्हा शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी पैसा खर्च केला.
Published on: 15 July 2020, 05:16 IST