Gold Price Update: रक्षाबंधनाचा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर तुम्हीही या सणाला सोने (Gold) किंवा चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे.
सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 20 रुपयांनी घट झाली आहे. तर चांदी 695 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यानंतर घसरणीनंतर सोन्याचा दर 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 57400 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळे सोने 4100 रुपयांनी तर चांदी 22600 रुपयांनी स्वस्त होत आहे.
शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रॅम 20 रुपयांनी स्वस्त होऊन प्रति 10 ग्रॅम 52019 रुपयांवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 473 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 52039 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर चांदी 695 रुपयांनी स्वस्त होऊन 57362 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 784 रुपयांनी महाग होऊन 58057 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे ट्विट; या दिवशी मिळणार 12व्या हप्त्याची रक्कम
सोने 4100 आणि चांदी 22600 पर्यंत उच्चांक दरापेक्षा स्वस्त
या घसरणीनंतरही, सोन्याचा भाव सध्या 4181 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 22618 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या नवीनतम किंमत
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशकांचा जीवाला धोका, घ्या ही घाबरदारी अन्यथा होईल मोठे नुकसान
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे शुक्रवारी 24 कॅरेट सोने 20 रुपयांनी स्वस्त होऊन 52019 रुपयांवर आले आहे, 23 कॅरेट सोने 20 रुपयांनी स्वस्त होऊन 51811 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 19 रुपयांनी स्वस्त होऊन 47649 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 20 रुपयांनी स्वस्त होऊन ते 39014 रुपये झाले आणि 14 कॅरेट सोने 12 रुपयांनी स्वस्त होऊन 30431 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ
खरे तर रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 162 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात (Bullion Market) अस्थिरतेची स्थिती आहे. अशा स्थितीत जगभरात सोन्या-चांदीच्या किमतीत हालचाली सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अरे व्वा! आता वीज आणि इंधनाशिवाय शेतकरी करणार शेती, या यंत्रामुळे काम झाले सोपे
मालामाल करणारी शेती! फणसाची लागवड ठरणार फायदेशीर, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सगळी माहिती
Published on: 06 August 2022, 09:01 IST