Others News

पेंशन धारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करणे खूप महत्त्वाचे असून आता ते सोपे झाले आहे. आपल्याला माहित आहेच कि यालाच लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण असे देखील म्हणतात. Eps किंवा पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवली जाते. या संबंधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ट्विट केले आहे की, ईपीएस पेंशनधारक मोबाईल ॲपच्या मदतीने फेस अथेंटीकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात व यालाच फेसआरडी अँप असे देखील म्हणतात.

Updated on 19 September, 2022 1:46 PM IST

पेंशन धारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करणे खूप महत्त्वाचे असून आता ते सोपे झाले आहे. आपल्याला माहित आहेच कि यालाच लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण असे देखील म्हणतात. Eps किंवा पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवली जाते.

या संबंधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ट्विट केले आहे की, ईपीएस पेंशनधारक मोबाईल ॲपच्या मदतीने फेस अथेंटीकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात व यालाच फेसआरडी अँप असे देखील म्हणतात.

नक्की वाचा:Magnet Project: नेमका काय आहे मॅग्नेट प्रकल्प? शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?

 याचा काय होईल फायदा?

 बऱ्याचदा वृद्धत्वामुळे फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांची बुबुळ स्कॅनमध्ये समस्या येते व त्यामुळे बायोमेट्रिक कॅप्चर केले जात नाही. त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्यात अडचण निर्माण होते. या समस्येपासून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र एक आधार देते.

याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे डिजिटल  लाइफ सर्टिफिकेटसाठी तुम्हाला मोबाईलची आवश्यकता भासते.  यासाठी पेन्शन धारक प्ले स्टोर वरून आधार फेसआरडी ॲप डाऊनलोड करू शकतात. या मोबाईल ॲप द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरी बसल्या कुठेही सहज जमा करता येईल.

नक्की वाचा:Epfo Rules: जर तुमच्या पीएफ खात्यावरील व्याज थांबले तर ही कारणे आहेत त्यासाठी कारणीभूत

या सेवेचा लाभ केंद्र आणि राज्य सरकार तसेच इतर सहकारी संस्थांच्या पेन्शनधारकांना घेता येईल.निवृत्‍ती वेतन धारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागत होते.परंतु आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा नियम बदलला आणि 18डिसेंबर 2019 रोजी त्यांचे परिपत्रक जारी केले.

यानुसार आता पेन्शनधारकांना वर्षात कधीही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.  वर्षातील ते तुम्ही कधीही सादर करू शकतात व ते पुढील एक वर्षासाठी वैध असते.

 कशी आहे ही प्रोसेस?

1- यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आधार फेसआरडी आर डी ॲप डाऊनलोड करा.

2- नंतर ऑपरेटर ऑथेंटिकेशन वर क्लिक करा.

3- नंतर पेन्शनर्स ऑथेंटिकेशन वर टॅप करा.

4- आपले सगळे डिटेल्स यामध्ये भरा.

5-त्यानंतर पूर्ण चेहरा प्रमाणीकरण करा.

6- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिजिटललाइफ सर्टिफिकेट दिले जाईल.

नक्की वाचा:Machinary: 'या' यंत्राच्या साह्याने ऊसातील आंतरमशागत होईल सोपी,वाचेल खर्च आणि वेळ

English Summary: facerd app is useful for submit digital life certificate of pension holder
Published on: 19 September 2022, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)