अलीकडे सोशल मिडीयाचा (Social media) चांगला प्रभावी वापर होत आहे सोशियलमीडिया पैकी सर्वात जास्त वापर केला जातो तो (Facebook) फेसबुकचा. फेसबुक फोटो, व्हिडिओ तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक सर्वात जास्तवापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. नुकतेच फेसबुक चे नाव बदलले गेले असून आता फेसबुकला मेटा (Meta) या नावाने ओळखले जाते. फेसबुक फक्त आपले विचार मांडण्यासाठी आपले फोटो शेअर करण्यासाठी उपयोगात येते असे नाही आता फेसबुक बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने देखील लोकांना सहकार्य करत आहे. फेसबुक द्वारे फक्त आपल्या बिझनेसचा (Business) विस्तारत होतो असे नाही तर आता फेसबूक बिझनेस साठी कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे. फेसबूक बिझनेस साठी बिना गारंटी कर्ज उपलब्ध करून देत आहे.
फेसबुक देते बिजनेस लोन
फेसबुक ने नुकतेच स्मॉल बिजनेस लोन इनिशिएटिव्ह (Small Business Loan Initiative) नामक योजना सुरू केली आहे. या बिझनेस लोन उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी फेसबूकने इंडिफी (Indifi) या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. देशात फेसबुकने सुरुवातीला या स्कीम अंतर्गत केवळ दोनशे शहरात लोनची सुविधा पुरवली होती, मात्र आता फेसबुकने याचा विस्तार करून आता देशातील जवळपास 329 शहरांमध्ये या स्कीम अंतर्गत लोन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फेसबुक द्वारे देण्यात येणाऱ्या या लोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यासाठी लोन घेणाऱ्या कडून कुठलीच प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. फेसबूक मार्फत लोन प्राप्त करण्यासाठी आपणास कुठेच हेलपाटे घालण्याची आवश्यकता नाही, आपण बिझनेससाठी लोन फेसबुक कडून ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करू शकता.
फेसबुकची पार्टनर कंपनी देते लोन
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बिझनेससाठी लोन फेसबूक देत नसून हे लोन indifi नावाची कंपनी देते. बिझनेस वाढवण्यासाठी आपणास ही कंपनी जवळपास 2,000,00 पासून ते 50 लाख रुपयापर्यंत विनातारण लोन उपलब्ध करून देते. म्हणजे हे लोन मिळवण्यासाठी आपणास कोणतीच मालमत्ता गहाण ठेवण्याचे काहीही कारण नाही. परंतु या लोन साठी फेसबुक 17 ते 20 टक्के पर्यंत वार्षिक व्याजदराने व्याज वसूल करत असते. असे असले तरी, नारी शक्तीचा सन्मान म्हणून या लोन वरती महिला उद्योजकांना 0.2 टक्के सूट देण्यात येते. लोन मंजूर झाल्यानंतर केवळ एका दिवसात कन्फर्मेशन कंपनीकडून प्राप्त होते, जे की उद्योजकांसाठी महत्त्वाची बाब आहे. मात्र उर्वरित कागदपत्रांची पूर्तता केवळ तीन दिवसात करणे बंधनकारक आहे.
कोण आहे या लोनसाठी पात्र
या लोन साठी फेसबूकने काही अटी देखील घालून दिल्या आहेत. या स्कीम अंतर्गत लोन प्राप्त करण्यासाठी, अर्जदाराचा व्यवसाय भारतात असणे आवश्यक आहे. तसेच या अंतर्गत लोन प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने कमीत कमी सहा महिने फेसबुक किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच फेसबुकच्या संलग्न असलेल्या सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा फेसबुक वर व्यवसायाची जाहिरात केलेली असली पाहिजे. फेसबुक फक्त देशातील लहान उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी लोन उपलब्ध करून देते. फेसबुक बड्या उद्योजकांना लोन देत नाही.
कसे मिळणार लोन
जर आपणास फेसबूक मार्फत लोन प्राप्त करायचे असेल तर आपणास Facebook Small Business Loan Initiative या त्यांच्या अधिकृत पेजवर भेट द्यावी लागेल. पेजवर भेट दिल्यानंतर आपणास अप्लाय नाव या पर्यायावर क्लिक करून समोर ओपन होणारा फॉर्म व्यवस्थित रित्या भरून सबमिट करावा लागणार आहे. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक तसेच व्यवसायाशी निगडीत माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर जर आपण लोन साठी पात्र असाल तर कंपनी स्वतःहून आपणास लोन साठी संपर्क करेल.
Published on: 06 February 2022, 02:19 IST