Others News

आपल्या खिशात शंभर, 50, पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या रंगीबिरंगी नोटा असतात. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्या छपाईसाठी किती खर्च येतो. या लेखामध्ये आपण त्याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 03 October, 2021 9:05 PM IST

 आपल्या खिशात शंभर, 50, पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या रंगीबिरंगी नोटा असतात. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्या छपाईसाठी किती खर्च येतो. या लेखामध्ये आपण त्याबद्दल माहिती घेऊ.

 आपल्याला माहिती आहेस की भारतामध्ये चलन किंवा  करन्सी लागू करण्याचा अधिकार रिझर्व बँक ऑफ इंडिया ला आहे.मिडीया रिपोर्टनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया नोटा छापण्यासाठी एक कमीतकमी रिझर्व सिस्टीम नियमाचे पालन करते. हा नियम 1956 साली बनवण्यात आला होता. रिझर्व बँक ऑफ इंडिया करन्सी नोट प्रिंटिंगच्या विरुद्ध कमीत कमी दोनशे करोड रुपये रिझर्व मध्ये कायम ठेवते. यामध्ये 115 करोड रुपये  गोल्ड आणि बाकीचे 85 करोड रुपयेवीदेशी चलनाच्या स्वरूपात ठेवावे लागतात.आपल्या देशामध्ये वर्तमान काळात 2000, 500, 200, 100, 50, 20, दहा इत्यादी रुपयांच्या नोटा चलनात आहे.

 कोणती नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रत्येकप्रकारची  नोट छापण्यासाठी वेगळ्या प्रकारचा खर्च येतो. दोनशे रुपयाची नोट छापण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाला 2.93 रुपये प्रति नोट असा खर्च येतो.दोनशे रुपयांच्या नोटेवर सांची का स्तूपचीछपाई केलेली आहे. तसेच पाचशे रुपयाची नोट छापण्यासाठी 2.94रुपये प्रति नोटा खर्च येतो. या नोटवर लाल किल्ल्याचा फोटो छापलेला असतो. तसेच दोन हजार रुपयाची नोट छापण्यासाठी 3.54 रुपये प्रति नोट खर्च येतो.ही नोट  देशातील चलनातील सगळ्यात मोठे किमतीच्या नोट आहे 2000 च्या नोटा ला नोटबंदी नंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने चलनात आणली होती.

 

 कोणत्या नोटेची सगळ्यात प्रथम छपाई झाली होती?

 रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर आरबीआय  ची स्थापना झालेली आहे. बँकेच्या स्थापनेचा तीन वर्षानंतर म्हणजेच 1938 सालि जानेवारी महिन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाने सगळ्यात अगोदर पाच रुपयाची नोट चलनात आणली होती. के नोट वर किंग जॉर्जVIचाफोटो छापलेला होता.म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या नऊ वर्षे अगोदर रिझर्व बँकेने सगळ्यात प्रथम चलन आणले होते.( संदर्भ-money control)

English Summary: expenditure of printing to currency to reserve bank of india
Published on: 03 October 2021, 09:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)