एखादा व्यवसायाची निवड करण्या अगोदर मनात मोठा प्रश्न समोर राहतो तो त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल होय. कारण व्यवसाय तुम्ही छोटा करा या मोठा त्याच्या पातळीपर्यंत व्यवसायाला भांडवल हे लागतेच. कारण आत्ताचा कालावधी हा व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे असेच म्हणावे लागेल.
जर आपण सरकारी नोकरी यांचा किंवा खाजगी नोकऱ्यांचा जरी विचार केला तरी बेरोजगार हातांच्या तुलनेत नोकऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे.
त्यामुळे आपला छोटासा व्यवसाय आणि अगदी छोट्या गुंतवणुकीतून उत्तम आयडिया डोक्यात ठेवून उभा करणे, कधीही उत्तम ठरेल. आज त्या लेखामध्ये आपणअशाच एका कमीत कमी गुंतवणूक लागणाऱ्या व्यवसायाची माहिती घेऊ.
छतावर सोलर पॅनल बसवून उभा राहू शकतो व्यवसाय, ऐकायला आहे अवघड परंतु अशक्यही नाही
या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या घराच्या छताचा वापर करून लाखो रुपये कमवू शकता. सोलर पॅनल तुम्ही कुठेही उभारू शकतात. या सोलर पॅनल च्या माध्यमातून तुम्ही तयार वीज विकू देखिल शकता किंवा वीज विभागाला पुरवू शकतात.
या व्यवसायाच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो. आपल्याला माहित आहेच की विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
त्यामुळे या व्यवसायाला भविष्यात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर हा व्यवसाय स्थापन करण्यासाठी म्हणजेच सोलर पॅनल उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के सबसिडी देखील मिळते व या व्यवसायाच्या उभारणीसाठी तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत खर्च होतो.
लागणारा खर्च
केंद्र सरकार सोलर प्लांट बसवण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असून भारतात तर काही राज्यांनी औद्योगिक क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प अनिवार्य केले आहेत. या व्यवसायात मोठी संधी असून यामध्ये तुम्ही सोलर पीव्ही, सोलर थर्मल सिस्टम, सोलर ऑप्टिक फॅन, सोलर कुलिंग सिस्टिम चा व्यवसाय सुरू करू शकतात.
यामध्ये विशेष बाब म्हणजे सौरऊर्जेची संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सह अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून कर्ज मिळू शकते.
हा खर्च राज्यानुसार बदलतो. सरकारचे अनुदान मिळाल्यानंतर अवघा 60 ते 70 हजार रुपयांमध्ये एक किलो वॅटचा सोलर प्लांट बसतो.
नक्की वाचा:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! मविआ करणार लवकरच एक लाख पदांची मोठी भरती
एक लाखापर्यंत कमाई होऊ शकते
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी आहे. परंतु तुमच्याकडे पैसे नसतील तर अनेक बँका त्यासाठी वित्त पुरवठा करतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत एसएमइ कर्ज घेऊ शकतात.
एका अंदाजानुसार हा व्यवसाय एका महिन्यात तीस हजार ते एक लाख रुपये सहज कमाई देऊ शकतो. एकदा सौर पॅनल उभे केले तर त्यांचे आयुष्य पंचवीस वर्षे असते.
या सौर पॅनल च्या साहाय्याने तुमच्या घराला वीज मोफत तर मिळेलच परंतु तुमच्या वापर होऊन उरलेली वीज ग्रीड द्वारे सरकार जो कंपनीला विकू शकतात.
तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलो वॅटचे सोलर पॅनल लावले तर दिवसातील दहा तास सूर्यप्रकाश असेल तर तुम्ही दहा युनिट वीज निर्माण करू शकता. या प्रमाणे तुम्ही महिन्याचा विचार केला तर 300 युनिट वीज निर्मिती करू शकता.
Published on: 16 June 2022, 09:42 IST