EPFO Interest Rates Hike: केंद्र सरकारकडून (Central Govt) लवकरच PF खातेदारांना (PF account holder) चांगली बातमी मिळू शकते. कारण सरकारने नोकरदारांच्या PF खात्यातील रकमेवर व्याजदर (Interest rate) वाढवणार असल्याचे वक्तव्य केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली आहे.
कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नसल्याचे सभागृहात सांगितले. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही मोठी माहिती दिली आहे.
सरकारने दिलेली माहिती
वास्तविक, हा प्रश्न सभागृहात रामेश्वर तेली यांना विचारण्यात आला होता की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवरील व्याजदर वाढविण्याचा सरकार फेरविचार करत आहे का? यावर लेखी उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, व्याजदराचा पुनर्विचार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.म्हणजे पीएफ खात्यावरील व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; जाणून घ्या नवीनतम दर
लहान बचत योजनांपेक्षा जास्त व्याज
कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनीही सांगितले की, EPF चा व्याजदर हा सामान्य भविष्य निर्वाह निधी (7.10 टक्के), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (7.40 टक्के) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना (7.60 टक्के) यासारख्या तुलनात्मक योजनांपेक्षा जास्त आहे.
म्हणजेच रामेश्वर तेली यांच्या मते, लहान बचत योजनांमधून पीएफवर मिळणारे व्याज अजूनही जास्त आहे, अशा परिस्थितीत पात्र सरकार व्याजदर वाढीचा विचार करणार नाही. EPF वर 8.10 टक्के व्याज देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
थंडी शेतकऱ्यांच्या फायद्याची, थंडीत 'ही' पिके घेऊन ३ महिन्यात कमवा बक्कळ नफा
असे मंत्री म्हणाले
रामेश्वर तेली म्हणाले की, पीएफवरील व्याजदर (PF interest rate) हा ईपीएफला त्याच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि असे उत्पन्न केवळ ईपीएफ योजना, 1952 नुसार वितरित केले जाते.
रामेश्वर तेली यांनी असेही सांगितले की सीबीटी आणि ईपीएफने 2021-22 साठी 8.10 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली होती, ज्याला सरकारने मान्यता दिली आहे, म्हणजेच यावेळी पीएफवर 8.10 दराने व्याज मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना १२ वा हफ्ता मिळायला का होतोय उशीर? या दिवशी मिळणार पैसे
1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा आदेश जारी? सरकारने दिली ही माहिती
Published on: 23 September 2022, 02:29 IST