Others News

इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

Updated on 24 June, 2022 4:39 PM IST

इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. भारतातील दिग्गज ई-काॅमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टवर कालपासून (ता. 23) इलेक्ट्राॅनिक वस्तूंचा सेल सुरु झाला आहे. त्यात ग्राहकांना अगदी निम्म्या किंमतीत इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करता येणार आहेत.फ्लिपकार्ट इलेक्ट्राॅनिक सेल (Flipkart Electronics Sale) 27 जूनपर्यंत चालणार आहे. या 5 दिवसांच्या सेलमध्ये तुम्हाला टीव्ही, अ‍ॅप्लायन्स व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक ऑफर मिळणार आहेत. त्यामुळे महागड्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

शिवाय या सेलमध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या कार्डवर, तसेच ‘ईएमआय’ (EMI) ट्रान्जंक्शनवर लगेच 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.काय आहे या सेलमध्ये?फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Vu Premium टीव्हीवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. कंपनीचा 43 इंच Ultra HD (4K) LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही डिस्काउंटनंतर फक्त 26,999 रुपयांत खरेदी करू शकता. त्यावर तब्बल 11,600 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही मिळेल. शिवाय, प्लिपकार्ट अॅक्सिस (Flipkart Axis) बँक कार्डवर 5 टक्के डिस्काउंट मिळेल.

सेलमध्ये ‘शाओमी’चा Mi 5X Ultra HD (4K) LED टीव्ही फक्त 31,999 रुपयांत खरेदी करु शकता.. त्यावर 8000 रुपयांपर्यंत ‘एक्सचेंज ऑफर’ मिळेल. शिवाय, एचडीएफसी बॅंकेचे क्रेडिट व डेबिट कार्डच्या ‘ईएमआय’वर 2000 रुपयांची सूट मिळेल.तसेच, ‘रिअलमी’ HD Ready टीव्ही फक्त 15,999 रुपयांत खरेदी करता येईल. त्यावर 8000 रुपयांपर्यंत ‘एक्सचेंज ऑफर’, फ्लिपकार्ट अॅक्सिस बॅंक कार्डवर 5 टक्के सूट मिळेल.टिव्हीशिवाय या सेलमध्ये एसी, वॉशिंग मशीन व रेफ्रिजरेटरही अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

या सेलमध्ये व्होल्टास 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्वर्टर एसी 37,999 रुपयांत मिळेल. सॅमसंगचा 198 लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटर फक्त 18000 रुपयांत खरेदी करता येईल. ही किंमत 5 स्टार सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची आहे.ओनिडा कंपनीचा 7 किलो फुल ऑटोमेटिक टॉप लोड मशीन फक्त 13,490 रुपयांत उपलब्ध आहे.फ्लिपकार्ट इलेक्ट्राॅनिक सेलमध्ये इतरही अनेक वस्तूंवर खास ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील 5 दिवस हा सेल चालणार असून, अगदी स्वस्तात या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

English Summary: Electronic Sale on Flipkart Great opportunity to buy these items at 'half price'!
Published on: 24 June 2022, 04:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)