Others News

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे दुचाकी वापरणे देखील परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे आता बराचसा ट्रेंड हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. व त्यादृष्टीने बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर असेच एक इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करण्यात आली आहे.हीइलेक्ट्रिक सायकल दुचाकीला टक्कर देईल इतकी सक्षम बनवण्यात आली आहे. या लेखात आपण या इलेक्ट्रिक सायकल विषयी माहिती घेऊ.

Updated on 20 September, 2021 10:55 AM IST

 जाणून घेऊया इलेक्ट्रिक सायकल बद्दल

 टाटा इंटरनॅशनल लिमिटेड च्या मालकीच्या असणाऱ्या स्ट्रायकर ने दोन इलेक्ट्रिक सायकल बाजारात लॉन्च केले आहेत. या सायकल द्वारे तुम्ही अवघ्या तीस पैशांमध्ये पाच किलोमीटरचे अंतर पार करू शकता. स्कायटरणे contino ETB 100 आणि voltic 1.7 या दोन सायकल भारतीय बाजारपेठेत लॉंच केले आहेत. या सायकली मधली contino ETB 100ही सायकल खास शहरी भागातील तरुणांवर फोकस करून बनवण्यात आली आहे.

ती सायकल एकदा चार्ज केल्यानंतर साठ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करते. या सायकलमध्ये स्मार्ट सेफ्टी फीचर्स असून 7 स्पीड आणि तीन राईड मोड देण्यात आले आहेत या सायकलीची किंमत 36 हजार 999 रुपये असून काळ्याआणि निळ्या रंगात सायकल उपलब्ध आहे.

Voltic 1.7 सायकल ची वैशिष्ट्ये

  • या सायकलीची किंमत 29 हजार 995 रुपयेठेवलीआहे.
  • हे सायकल ग्रे आणि रेड कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • या सायकली मध्ये शक्तिशाली मोटर आणि लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे.
  • या सायकल ची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात.
  • एकदाही सायकल चार्ज झाल्यानंतर 25 ते 28 किलोमीटर पर्यंत धावते
  • या सायकलचा प्रति तास वेग हा 25 किलोमीटर आहे.
  • या सायकली वर कंपनी दोन वर्षाची वारंटी ही देत आहे.
English Summary: electric cycle launch by tata international limited
Published on: 20 September 2021, 10:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)