एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडण्याच्या मार्गावर असून शिवसेनेतील तब्बल 35 आमदार फोडून एकनाथ शिंदेनी ठाकरे सरकारला जबरदस्त धक्का दिला आहे.
औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यातील पूर्ण शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आता तर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत असल्याचा दावा केला असून आमचा गट हीच खरी शिवसेना असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे संघटनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या आमदारांना सोबत घेऊन एक स्वतंत्र गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे.
जर या सगळ्या परिस्थितीचा पक्षांतर बंदी कायद्या नुसार विचार केला तर शिवसेनेचे एकूण आमदार पंचावन्न आहेत, पैकी दोन तृतीयांश म्हणजे 37 आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्या आमदारकीला धोका राहत नाही.
याच कायदेशीर नियमाचा आधार घेत एकनाथ शिंदे हे आमदारांचा स्वतंत्र गट तयार करणार आहेत. अल्पमतात आलेले महा विकास आघाडी सरकार पायउतार होता क्षणी शिंदे यांचा हा गट भाजपला पाठिंबा देईल.
भाजपचे एकूण 106 त्यांचे मूळ आमदार आहेत व 28 समर्थक आमदार आणि शिंदे यांचा गट मिळून सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.
या बदल्यात शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद व त्यांच्या गटाला नऊ ते दहा मंत्रीपदेयेणार असल्याची माहिती शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
मध्यावधी निवडणुका लागतील का?
एकनाथ शिंदे गट स्थापन करू शकले नाहीत तर त्यांच्या सह समर्थक आमदार राजीनामा देतील. त्यामुळे ठाकरे सरकार पायउतार होईल व राष्ट्रपती राजवट लागू होईल. या सगळ्या परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.
नक्की वाचा:मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..
विधानसभेचे सध्याचे गणित
शिवसेना एकूण पंचावन्न आमदार, राष्ट्रवादी एकूण 53 आमदार, काँग्रेस एकूण 44 आमदार, भाजप एकूण 106 आमदार, मनसे एकूण एक आमदार, एम आय एम 2 आमदार, प्रहार जनशक्ती एकूण दोन आमदार, अपक्ष 13, शेकाप एक, सपा 2, माकप एक, बविआ 3, स्वाभिमानी एक आणि इतर तीन असे सध्याचे विधानसभेचे बलाबल आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी! राज्यात खळबळ; बाळासाहेब थोरात राजीमाना देणार? सूत्रांची माहिती
Published on: 22 June 2022, 08:53 IST