Others News

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे होते. हे आंशिक सूर्यग्रहण सहा राशीच्या (Horoscope) लोकांना पुढील एक महिना त्रास देऊ शकते. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश असेल जाणून घेऊया.

Updated on 26 October, 2022 5:19 PM IST

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे होते. हे आंशिक सूर्यग्रहण सहा राशीच्या (Horoscope) लोकांना पुढील एक महिना त्रास देऊ शकते. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश असेल जाणून घेऊया.

मेष

तूळ रास मेष राशीपासून सातव्या भावात आहे, ज्यामध्ये हे ग्रहण झाले आहे. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही काही काम करत असाल आणि पुढच्या एक महिन्यापर्यंत त्याचे फळ मिळाले नाही तर काळजी करू नका.

वृषभ

हे ग्रहण वृषभ राशीपासून सहाव्या भावात झाले आहे. वृषभ राशीच्या जातकांनी भांडणापासून दूर राहावे. उधारीचे व्यवहार टाळा. पुढील एक महिना तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. ग्रहणानंतर आंघोळ करून दोन किलो पीठ एखाद्या गरीबाला दान करावे.

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका; भाज्यांचे दर तेजीत, जाणून घ्या किमती

मिथुन

मिथुन राशीपासून पाचव्या भावात ग्रहण आहे. मिथुन राशीच्या जातकांनी वाणीवर संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. पुढील एक महिना लांब प्रवास टाळा. जर तुम्हाला नाईलाजास्तव प्रवास करावा लागत असेल तर विशेष काळजी घ्या.

कर्क

हे ग्रहण कर्क राशीपासून चौथ्या भावात पडत आहे. कर्क राशीच्या जातकांनी कुटुंबात मतभेद होऊ देऊ नये. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादात पडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका. ग्रहणानंतर स्नान करून भगवान शंकराची पूजा करा.

सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या

सिंह

सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सिंह राशीच्या लोकांनी ग्रहण काळात शांत राहावे. रागाला आवार घालावा. बोलताना विचार करून बोलावे. ग्रहणानंतर आंघोळ करून एक किलो गुळ एखाद्या गरीबाला दान करा.

कन्या

कामाच्या ठिकाणी विनम्रतेने वागावे. मनात अहंकार ठेवू नये. पुढील एक महिना नोकरी किंवा व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये संयम ठेवा. ग्रहणानंतर गरिबांना अन्नपदार्थ दान करा.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो हरभरा पिकाची पेरणी 'या' तारखेपासून सुरू करा; मिळेल भरपूर उत्पादन
थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर

English Summary: Effect solar eclipse one month these six signs How protect
Published on: 26 October 2022, 05:19 IST