आपल्यापैकी बर्याच जणांनी जीवन विमा पॉलिसी काढलेली असते. आपला भविष्यकाळ सुरक्षित राहावा हा यामागचा प्रमुख उद्देश असतो किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील जीवन विमा पॉलिसी महत्त्वाचे असतात. आपल्याला माहित आहे की जीवन विमा पॉलिसीवर देखील सहजरित्या कमी दरात कर्ज दिले जाते. त्याबद्दल आपण या लेखामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी समजून घेऊ.
नक्की वाचा:LIC ची खास योजना! मुलीच्या लग्नावर मिळणार 27 लाख रुपये
जीवन विमा पॉलिसी कर्जाचे स्वरूप
1- पॉलिसीचे जे काही समर्पण मूल्य आहे त्याच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते.
2- समजा तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर तुमची पॉलिसी रद्दबातल होते.
3- कर्जाचा व्याजदर दहा ते बारा टक्के आहे.
4- तुम्हाला जे काही कर्जाची रक्कम मिळणार हे तुम्ही घेतलेल्या पॉलीसीचा प्रकार कोणता आहे व त्याचे सरेंडर मूल्य यावर अवलंबून असते.
5- मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ही सरेंडर मूल्याच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असते.
6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे मनी बँक किंवा एंडोमेंट पॉलिसी असेल तरच कर्ज मिळते.
नक्की वाचा:जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा
किती व्याजदर असतो?
त्यामध्ये तुमच्या प्रीमियमची रक्कम व तुम्ही भरलेल्या प्रीमियमच्या व्याजदरावर अवलंबून असते. तुमचा प्रीमियम जितका जास्त आणि प्रीमियमच्या संख्या जितकी जास्त तितका व्याजदर कमी असतो.यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या काही पॉलिसीवर कर्ज घ्यायला त्यामध्ये कर्जावर व्याजाव्यतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.
लागणारी कागदपत्रे
जीवन विमा पॉलिसीच्या कर्जासाठी तुम्ही करत असलेल्या अर्जासोबत तुम्हाला जीवन विमा पॉलिसीचे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
तसेच कर्जाची रक्कम मिळावी यासाठी तुम्ही करत असलेल्या अर्जासोबत रद्दीकरण धनादेश जोडणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
समर्पण मूल्य म्हणजे काय?
जीवन विमा पॉलिसीच्या बाबतीत पॉलिसी पूर्ण कालावधीसाठी चालू होण्यापूर्वी ती सरेंडर करून तुम्हाला भरलेल्या प्रीमियमचा काही भाग परत मिळतो. यामध्ये काही शुल्क वजा केली जाते व या रकमेला समर्पण मूल्य म्हणतात.
नक्की वाचा:निवृत्तीचे वय वाढणार, जाणून घ्या EPFO ने मर्यादा वाढवण्याचे समर्थन का केले
Published on: 05 September 2022, 03:25 IST