पॅन कार्ड आवश्यक अशा सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत खाते उघडणे पासून तर आयकर रिटर्न भरण्यापासून तसेच विविध प्रकारचे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. पॅन कार्ड भारत सरकारच्या आयकर विभागाकडून जारी केले जाते. आपल्याला माहिती आहेच की पॅन कार्ड ची आवश्यकता ही जर तुम्हाला पन्नास हजारांवर व्यवहार करायचे असतील तर तेव्हा लागते.
कार्ड वर असलेल्या दहा अंकी क्रमांकामध्ये तुमचे सगळे वैयक्तिक माहिती लपलेली असते. त्यामुळे एखाद्या वेळेस जर पॅन कार्ड हरवले तर तो धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी पॅन कार्ड सोबत नेणे धोकादायक ठरू शकते. चोरी किंवा कुठेतरी गहाळ होणे अशामुळे ईपॅन कार्ड हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल आता ई पॅन कार्ड वापरण्याकडे वाढला आहे. हे पॅन कार्ड तुमच्या मूळ पॅन कार्डची व्हर्च्युअल प्रत असते. जी प्रत्येक शासकीय किंवा कुठल्याही आवश्यक कामांमध्ये स्वीकारले जाते. या लेखात आपण ई पॅन कार्ड चे फायदे जाणून घेऊ.
ई पॅन कार्डचे फायदे
- वापरणे सोयीचे ठरते-ई पॅन कार्ड तुमच्या मूळ पॅन कार्ड पेक्षा अधिक सोयीस्कर आहे. पॅन कार्ड तुम्ही कधीही आणि कुठेही वापरू शकता. तुम्हाला ते स्कॅन किंवा फोटो कॉपी करण्याची गरज नाही.
- सांभाळणे सोपे असते- पॅन कार्ड चे हार्ड कॉपी सोबत बाळगणे खूप अवघड जाते. यासाठी ई पॅन कार्ड जर तुम्ही वापरले तर बऱ्याच समस्यांपासून सुटका होते. कारण ते पॅन कार्ड च्या हर्डकॉपी सारखे बॅग किंवा पर्स मध्ये ठेवावे लागत नाही.
- कुठूनही डाऊनलोड करता येते- जर एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या पॅन कार्ड आणायला विसरलात तर तुमचे ई पॅन कार्ड तुमचा फोन किंवा लॅपटॉप मधुन कुठूनही इंटरनेटच्या मदतीने डाऊनलोड करू शकता.
- हरवण्याची भीती राहत नाही- अनेक वेळा मूळ पॅन कार्ड हरवण्याची भीती असते. कधीकधी आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेले पॅन कार्ड कुठेतरी गहाळ होते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे इपॅनकार्ड वापरणे सोयीचे ठरते. कारण आपण त्याचे सॉफ्ट कॉपी आपल्या फोन किंवा लॅपटॉप मध्ये ठेवू शकतो आणि गरज पडेल तिथे वापरू शकतो.
( माहिती स्त्रोत – सकाळ)
Published on: 07 December 2021, 10:51 IST