केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नव- नवीन योजना आणत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील आणि त्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळेल. शेतकऱ्यांसाठी घरातच मंडई आणणाऱ्या ई-नाम (e-NAM) पोर्टलमध्ये सरकारने नवीन मंडई जोडल्या आहेत. केंद्र सरकारने भारतभरातील तब्बल ४१५ नव्या मंडई जोडल्या आहेत. यामुळे नॅशनल कृषी मार्केटमध्ये (National Agricultural Market ) जुडलेल्या मंडईंची संख्या १ हजार झाली आहे. साधारण २ हजार ७०० मंडई या कृषी उत्पादने आणि ४ हजार उप मार्केट आहेत. सध्याच्या घडीला १. ६८ कोटी शेतकरी , व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना या ई-नामशी जोडल्या गेल्या आहेत. नोंदणी झालेले शेतकरी ,व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना हे आपल्या घरात बसून भारतातील ई-मंडईमध्ये आपला शेतमाल विकू शकतात.
शेतकरी ई-नामचा कसा घेऊ शकतात फायदा
भारतभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे नॅशनल कृषी मार्केट (National Agricultural Market ) किंवा ई-नाम ( e-NAM) हे ऑनलाईन पोर्टल आहे. सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ या पोर्टलच्या माध्यमातून मिळत असते. पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या स्थानिक शेतमालाला देशभरात पोहचवणे हा आहे. साधारण २२ कोटी शेतकरी या ई-नाम पोर्टलच्या मदतीने आपला शेतमाल देशाच्या निरनिराळ्या मंडईत विकत आहेत. हा सर्व व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असतो, त्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. आणि कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो. या ऑनलाईन मंडईमध्ये १८ राज्यातील १ लाख ६६ हजार ७१८ शेतकीर, ९४२ शेतकरी उत्पादक संघटना, ७० हजार ९१० अडते. आणि १ लाख २८ हजार ०१५ व्यापारी असून हे ऑनलाईन मंडई चालवत आहेत. आता तर ४१५ मंडई जुडल्यानंतर हा आकडा अजून वाढेल. यामुळे बहुसंख्य शेतकरी या ऑनलाईन ट्रेडिंगचा लाभ घेऊ शकतील.
ई-नाम शी शेतकरी कसे जुडतील -
enam.gov.in. या संकेतस्थळावर जा. तेथील सर्च बारवर जा आणि सर्चमध्ये नोंदणी या पर्यायाला क्लिक करा, त्यानंतर फार्मर(farmer) हे पर्याय निवडा. आपल्या ईमेल आयडीच्या मदतीने लॉन इन करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या इ-मेलवर एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल. त्यानंतर तुम्हाला एक तात्पुरती ईमेल आय़डी आणि पासवर्ड मिळेल. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करु शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डासबोर्डमध्ये तुम्ही आपल्या कागदपत्रांची नोंदणी करु शकता. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यास मान्यता मिळाली की तुम्ही व्यवहार करण्यास सुरुवात करु शकता. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही https://enam.gov.in/web/resources/registration-guideline या संकेतस्थळावर जाऊ माहिती घेऊ शकता.
Published on: 13 April 2020, 09:22 IST