इ बाईकगो ने भारतीय बाजारात बुधवारी जी1 आणि जी1+ या दोन आवृत्त्यांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. स्कूटर ची किंमत 79 हजार 999 रुपये आहे. तसेच जी 1+ ची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. या दोन्ही किमतींमध्ये फेम ll सबसिडीचा समावेश करण्यात आला आहे.
भारतामध्ये वाढत असलेले आहे इलेक्ट्रिक वाहनाच्या बाजारात हीस्कूटर तिच्या कामगिरी आणि श्रेणीमुळे चमत्कार करू शकते.
Rugged इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2 kwh बॅटरी आहे. कंपनीने या बाबतीत दावा केला आहे की बॅटरी साडेतीन तासात चार्ज होऊ शकते आणि त्याची रेंज सुमारे 160 किलोमीटर आहे. तसेच या स्कूटर मध्ये 3kw ची मोटार असून ते स्कूटरला 70 किमी प्रति तास वेगाने धावण्यात मदत करते.
ई बाईक गो स्कूटर ची वैशिष्ट्ये
1-Rugged इलेक्ट्रिक स्कूटर ची स्टोरेज क्षमता 30 लिटर आहे.
2- ते ॲण्टी थेफ्ट फीचर चा दावा देखील करतात.
3- ही ई स्कूटर चालवण्यासाठी Ruggedअँपचा वापर केला जातो.
4- या स्कूटर मध्ये दोन सेन्सर आहेत.
5- यामध्ये 4G,BLE, CAN बस,GPS/IRNSS, 42 इनपुट /आउटपुट,सिरीयल पोर्ट आणि एक सर्वसमावेशक मोड्युलर सेंसर आहे. जगातील सर्वात प्रगत 2w loTप्रणाली आहे.
भारतात डिझाईन आणि उत्पादित ई बाईकगो असा दावा करते की, Rugged इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या नावाप्रमाणेच देशातील आव्हानात्मक रस्त्यांच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी बाईक्सच्याचेसिसवरसात वर्षाची वारंटी देखील देत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर Rugged इलेक्ट्रिक स्कूटर ची बुकिंग 499 रुपयांच्या परताव्याच्या रकमेसाठी खुली आहे.
संदर्भ (Z 24taas)
Published on: 28 August 2021, 11:47 IST