मराठवाडा मध्ये सतत निसर्गाचा चढ उतार आपल्याला दिसून येतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोरडवाहू शेतीमधून पारंपरिक पिकासोबत दुसऱ्या पिकांची लागवड करणे अत्ता गरजेचे आहे.सध्या कोरडवाहू शेतीमध्ये जर ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली तर फायद्याचे ठरणार आहे आणि याचे उत्तम मॉडेल गंगामाई कृषी उद्योगाने तयार केलेले आहे.
गंगामाई कृषी उद्योगाने तब्बल ७२ एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली आहे जे की या शेतीमध्ये स्वतः व्यापारी खरेदी करण्यासाठी येत आहेत. ड्रॅगन फ्रुट साठी कमी पाणी तसेच त्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे दुष्काळ भागात या फळांचे उत्पादन घेणे एक वरदान ठरत आहे.ड्रॅगन फ्रुटमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे अनेक आजारांनावर हे लाभदायक ठरते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच कॅलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट चा उपयोग होतो याचप्रमाणे पचनक्रिया साठी आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला उपयोग होतो.
हेही वाचा:सेंद्रिय पदार्थांचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे….
बारा वर्षापर्यंत चांगली फळधारणा:-
बबन अनारसे हे अजित सिडसचे उपसरव्यवस्थापक आहेत जे की यांनी असे सांगितले की ड्रॅगन फ्रुट हे फळ एक उष्णकटिबंधीय फळ आहे आणि मेक्सिको हे त्याचे मूळ आहे आपल्या भागात या फळाला पूरक वातावरण सुद्धा आहे. २०१९ साली हनुमंतगाव येथे एक एकर शेतात ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली होती.एक एकर मध्ये ४५० पोल्स वर प्रति ४ रोपे लावलेली आहेत जे की प्रति पोल ला पहिल्या वर्षी २ ते ३ किलो शेणखत व १०० ग्राम ऐनपिके दिल्याने त्यावर चांगला परिणाम होतो. दुसऱ्या वर्षी प्रति पोल जी ४ रोपे लावली आहेत त्यास १० किलो शेणखत द्यावे. जवळपास एक वर्षात झाडाला फळे येतात मात्र जर चांगली फळे घेण्यासाठी सुमारे २ वर्ष लागतात. एकदा की झाडाला फळे आली की तिथून पुढे १२ वर्ष फळ येण्यास चालूच राहतात.
अर्ध्या किलोहून जास्त वजनाचे फळ:-
गंगामाई कृषी उद्योगाने जम्बो रेड व मलेशियन पर्पल या दोन जातीच्या फळाची शेतात लागवड केली आहे. जे की या दोन्ही जातींचा आकार चॅन असतो आणि सर्वात विशेष बाब म्हणजे एका फळांचे वजन जवळपास ५०० ते ७०० ग्रॅम पर्यंत असते.सध्या ७२ एकर ड्रॅगन फ्रुट ची लागवड केलेली आहे आणि येईल या काळात अजून २५ एकर वर याची लागवड करण्याचे नियोजन सुरू आहे.
Published on: 30 August 2021, 11:49 IST