Others News

पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला

Updated on 16 June, 2022 7:41 PM IST

पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला डॉ. मनीषा देशमुख' श्री नितीन गुप्ता श्री. अनुज राउत ' डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांअतर्गत नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरा महिन्याचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम अकोला, नागपूर व काटोल येथे सुरु असून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तर हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमात फळझाडे, फुलझाडे, व भाजीपाला पिकाच्या लागवडीपासून ते अभिवृद्धीपर्यंत प्रात्याक्षिक करून घेतल्या जाते. तसेच बौद्धिक अभ्यासक्रमही शिकविल्या जातो. माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी किवा खाजगी संस्थेमध्ये नोकरीची संधी असली तरी आजच्या काळात नोकरी मिळणे सोपे काम राहीलेले नाही. तरीही हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी भांडवलात फुलझाडांची, फळझाडांची रोपे/कलमे, गुलाबाची कलमे,

बोन्साय, कॅक्टस, लॉन इत्यादी प्रकारे थोड्या जागेत वाढवून विकण्याच्या व्यवसाय करू शकतो. त्याचप्रमाणे फुलापासून हार, माळा तसेच निरनिराळ्या प्रकारचे पुष्पगुच्छ तयार करून विकण्याचा व्यवसाय करू शकतो.सध्याच्या आधुनिक शेतीच्या काळात बागकामासाठी कुशल माळ्याची गरज अधिक आहे. कमी माळी बनण्यासाठी कृषी विद्यापीठात माळी प्रशिक्षण प्राप्त करण्याच्या संधीचा फायदा घेऊन अनुभवाच्या भरवश्यावर खाजगी संस्थामध्ये, रोपवाटिकेत, पार्टटाईम नोकरी, ठेकेदारी पद्धतीने बगीचे तयार करून देणे, मोठ्या मोठ्या बंगल्यातील कारखान्यातील बगीच्याची निगा राखणे, कुंड्याची लायब्ररी तयार करणे, हिरवळ तयार करून देणे,

निरनिराळ्या कार्यक्रमात तसेच विवाह समारंभासाठी फुलांची सजावट इत्यादी उपक्रमातून सुद्धा मिळकत प्राप्त करता येऊ शकते. शेतकऱ्यांच्या मुलांना तर या माळी प्रशिक्षणानतर घरच्या शेतामध्ये फळझाडांच्या कलमांची, गुलाबाच्या कलमांचे नर्सरी तयार करणे, फळबाग लावणे तसेच बाजारपेठ जवळ असल्यास फुलशेती ही करणे शक्य होते. शिक्षणात कुशल ज्ञान आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात माळी अभ्यासक्रमासाठी अकोला येथे अकोला, वाशीम,बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्हायासाठी १०० जागा तर कृषी महाविद्यालय महाराज बाग नागपूर येथे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्हासाठी १०० जागा व काटोल व

अचलपूर येथे ५० जागा असून प्रवेशासाठी नववीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याच्या दाखलाआवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी जाहिरात साधारणपणे जून च्या चौथ्या आठवड्यात वर्तमानपत्रात देण्यात येते. त्यानुसार प्रवेशाचे अर्ज प्रभारी अधिकारी, माळी प्रशिक्षण केंद्र, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला तसेच कृषी महाविद्यालय नागपूर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल व कृषी संशोधन केंद्र, अचलपूर येथे प्रवेशाची जाहिरात निघाल्यानतर मिळतील. फक्त नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी माळीप्रशिक्षण अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो

English Summary: Dr. P.D. Golden Opportunity for Grade 9th Pass Students in Agriculture University, a useful course in Gardener Training Center
Published on: 16 June 2022, 07:41 IST