Others News

आधार कार्ड हे आजच्या युगातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. शाळेच्या प्रवासापासून ते महाविद्यालयात प्रवेश, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते शेअर बाजारात गुंतवणूक करणे, बँक खाते उघडणे इत्यादी सर्व आवश्यक कामांसाठी आधार कार्ड उपयुक्त आहे.

Updated on 08 May, 2022 6:13 PM IST

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhar card) हे आजच्या युगातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. शाळेच्या प्रवासापासून ते महाविद्यालयात प्रवेश, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते शेअर बाजारात गुंतवणूक करणे, बँक खाते उघडणे इत्यादी सर्व आवश्यक कामांसाठी आधार कार्ड उपयुक्त आहे.

आधार कार्ड योजना 2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सुरू केली होती. ज्याचा सर्वाना लाभ मिळत आहे. आधार कार्ड हे इतर कागदपत्रांपेक्षा खूप वेगळे मानले जाते कारण त्यात आपली बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. आधार कार्ड बनवताना आपल्या हातांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे रेटिना स्कॅन केले जातात.

Happy Mother's Day 2022 : 'सबसे बडी योद्धा माँ होती हैं', निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी माया म्हणजे आई..!
शेतकऱ्याचा नादच खुळा..! बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते कुठेतरी हरवले तर खूप त्रास होतो. तुमचे आधार कार्ड जर हरवले तर ते परत कसे मिळवायचे ते जाणून घेऊ... या समस्येवर मात करण्यासाठी UIDAI ने एक अँप (Aadhaar App) लॉन्च केले आहे. या अँपच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार सहज सेव्ह करू शकता.

१. अशा प्रकारे तुम्ही Aadhaar अँपवर प्रोफाइल तयार करू शकता
२. Aadhaar अँपपवर प्रोफाइल तयार करण्यासाठी, तुम्हाला प्रथम नोंदणी आधार पर्याय निवडावा लागेल.
३. यानंतर तुम्हाला ४ अंकी पासवर्ड तयार करावा लागेल.
४. यानंतर तुमच्याकडून विचारलेल्या आधार तपशील भरा.
५. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो जो टाकावा लागेल.
६. यानंतर तुमचा आधार क्रमांक Aadhaar अँपमध्ये नोंदणीकृत होईल.
७. यानंतर तुम्हाला मेनूमधील My Aadhaar टॅबवर क्लिक करावे लागेल.
८. तुम्ही येथे 4 नंबर पिन टाकू शकता
९. यानंतर तुमचे आधार कार्ड तुम्हांला मोबाइल मध्ये सॉफ्ट कॉपी मिळेल.

Indian Railways : कामाची बातमी : रेल्वे मधील सीट आणि टीसीचे नियम जाऊन घ्या...
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! DA वाढू शकतो, जाणून घ्या किती वाढणार...

English Summary: Don't worry if you lose Aadhar card; Get it back like this
Published on: 08 May 2022, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)