अनेक लोकांची पैसे टिकत नाही अशी तक्रार असते,आणि त्यामुळे घरात नेहमी निगेटिव्हिटी पसरलेली असते असे देखील अनेकांचे म्हणणे असते. पैसा हातात येतो खरा मात्र पैसा हा क्षणातच नाहीसा होत असतो, घरातील सदस्य नेहमीच आजारी असतात, तसेच घरात नेहमी कलहाचे वातावरण तयार झालेले असते.
वास्तुशास्त्रानुसार बघायला गेले तर याला वास्तुदोष म्हणून संबोधले जाते. वास्तुदोष असल्याकारणाने घरात नेहमी तणावाचे वातावरण असते, पैसा टिकत नाही. जर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नसेल तर अशा निगेटिव्हिटी हावी होत असतात.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक वास्तुशास्त्र तज्ञ घरात क्रसुला नामक झाड लावण्याची शिफारस करत असतात.क्रासुला नामक झाड घरात लावले असता घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते व घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो.
वास्तु शास्त्रमध्ये क्रास्सुला झाडाची मोठी महती वर्तवण्यात आली आहे. या झाडाला घरात ठेवल्यास घरात धनधान्य मुबलक प्रमाणात येत असते शिवाय यामुळे घरात शांती नांदत असते.
क्रासुला झाडांना लकी ट्री, मनी ट्री, जेड ट्री अशा नावाने देखील संबोधले जाते. वास्तुशास्त्रात या झाडाला पैशाचे झाड म्हणून ओळखले जाते. क्रासुला झाडाला घरात योग्य दिशेला ठेवले असता घरात नेहमी सुख शांती लाभते शिवाय यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम असतो.
वास्तुशास्त्रानुसार क्रासूला झाडाला घराच्या मुख्य द्वारापाशी ठेवले असता यापासून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. क्रासुला झाडाला दरवाजाच्या उजव्या दिशेला ठेवले असता यापासून विशेष लाभ प्राप्त होत असतो. हे झाड ठेवताना सूर्याचे प्रकाश त्यावर पडतील याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
दिवसातून एकदा तरी या झाडावर सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असते. जर या झाडाला दक्षिण दिशेत ठेवले गेले तर यापासून काही अपायकारक घटना देखील होऊ शकतात तसेच त्यामुळे घरात पैशाची हानी होऊ शकते म्हणून या झाडाची योग्य त्या दिशेत मांडणी करणे महत्त्वाचे असते.
गोष्ट छोटी आभाळाएवढी; छोट्या जिऱ्याचे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे
क्रासूला झाडांची पाने हे कॉइन प्रमाणे असतात, तसेच या झाडा साठी जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते हे झाड सावली मध्ये देखील चांगल्या पद्धतीने विकसित होते.
वास्तुशास्त्रानुसार या झाडात पैसे ओढण्याची टाकत असते म्हणून या झाडाला घरात लावले असता त्यामुळे घरात नेहमी सुख शांती लाभते व घरात लक्ष्मीचा वास कायम असतो. या झाडाला घरात ठेवले असता पैशांची वृद्धी होत असते.
21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
Published on: 15 January 2022, 03:29 IST