Others News

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत ट्रॅफिक नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर सरकारनं बडगा उगारला आहे.

Updated on 24 June, 2022 1:57 PM IST

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत ट्रॅफिक नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर सरकारनं बडगा उगारला आहे. वाहन चालवताना काही चुकी झाल्यास किंवा काही वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना थांबवलं तर वाद होत असतात त्यांना चाप लावण्यासाठी नवीन कायदा आणण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर या कायद्यानं आळा घालण्यात येणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) वाहतूक पोलिसांना तुमची कागदपत्रे तपासण्याचा अधिकार आहे. मात्र, अनेक जण नियमभंग करुन वर वाहतूक पोलिसांनाच अरेरावी करतात. मात्र, सावधान आता वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्यास, ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं..

हेही वाचा : कमी बजेटचा स्मार्टफोन! अगदी लो बजेट Reality C30 फोन लॉन्च, जाणून घेऊ या फोनची वैशिष्ट्ये

नियम काय..?

वाहनाची कागदपत्रे तपासताना किंवा कोणत्याही प्रकारे वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन केल्यास, नियम 179 ‘एमव्हीए’नुसार, वाहतूक पोलिस तुमचे 2000 रुपयांचे चलान कापू शकतो. तसा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. त्यामुळे तुमच्याकडे वाहन चालवण्याची सगळी कागदपत्रे असली, तरी तुम्हाला 2000 रुपयांचा चुना लागू शकतो. रस्त्यावर वाहन चालवताना, ट्रॅफिक पोलिसांशी (traffic police) कोणत्याही प्रकारे गैरवर्तन न करण्याचे भान राखलेलेच बरं.

 

समजा, वाहतूक पोलिसाने तुमच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा तुम्हाला त्याची तक्रार करता येते. असे प्रकरण कोर्टात नेण्याचाही पर्याय आहे. नवीन नियमानुसार, आता दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटची पट्टी लावलेली असणं आवश्यक आहे, अन्यथा डोक्यावर हेल्मेट असलं, तरी मोटार वाहन कायद्यानुसार, 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. शिवाय, सदोष हेल्मेट (BIS शिवाय) असल्यास, 1000 रुपयांचे चलान कापले जाणार आहे.

हेही वाचा : BMW व Mercedes या ठिकाणी मिळतायेत अतिशय कमी किंमतीत, किंमत ऐकून तुम्हीही….

गाडीवरील दंड कसा समजणार..?

आता वाहतूक पोलिसांंकडून तुमच्या गाडीच्या क्रमांकावर चलान फाडले जाते.. तुमच्या गाडीवर दंड आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. तेथे ‘चेक चलन स्टेटस’वर क्लिक करा. तुमच्यासमोर चलन क्रमांक, वाहन क्रमांक व ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL)चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा. नंतर गेट डिटेलवर (Get Detail)वर क्लिक केल्यावर चलानची स्थिती दिसेल.

 

असे भरा चलान..

• सर्वप्रथम..
https://echallan.parivahan.gov.in/ वर जा व चलानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि ‘तपशील मिळवा’वर क्लिक करा.
• चलानचे तपशील समोर आल्यावर ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
• पेमेंट संबंधित माहिती भरा आणि पेमेंटची खातरजमा करा. आता तुमचे ऑनलाइन चलान भरले गेले असेल.

English Summary: Don't argue with the traffic police , otherwise action will be taken according to the new rules
Published on: 24 June 2022, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)