Others News

विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे.

Updated on 07 June, 2022 9:15 PM IST

विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे. ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते.विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे? विंचु डंख मारतो,इतकच ना?तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे.विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते

निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.कासवा विषयी आपल्याला माहित असेलच;कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे.विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही.आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते.विंचवी बिचारी कासाविस होते,पण द्यायला तर काहीच नाही.पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते.आता पिलांची भुक अनावर होते,ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात,पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात,आणि विंचवी.विंचवी.

हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!याला म्हणायचं आईचं आईपण."आई "मग ती मुंगी,शेळी,वाघीण,गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत.ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं.या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खुप प्रेम द्या. कारण तीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे.

विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.कासवा विषयी आपल्याला माहित असेलच;कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे.विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही.आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते.विंचवी बिचारी कासाविस होते,पण द्यायला तर काहीच नाही.

 

मायबापे केवळ काशी।

तेणे न जावे तिर्थाशी।

English Summary: Do you know this horrible information about scorpions?
Published on: 07 June 2022, 02:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)