Others News

मोदी सरकार नागरिकांच्या समुद्धीसाठी विविध योजना आखत असते. या योजनेच्या साहाय्याने नागरिक आपले जीवन सुखकर करत असतात. अशीच एक योजना आहे, ही योजना आधी २०१० मध्ये इंदिरा गांधी मातृ सहयोग स्कीमच्या रुपात सुरु करण्यात आली होती. या योजनेला मातृत्व सहयोग योजना असं म्हटले जात होते.

Updated on 10 July, 2020 6:01 PM IST


मोदी सरकार नागरिकांच्या समुद्धीसाठी विविध योजना आखत असते. या योजनेच्या साहाय्याने नागरिक आपले जीवन सुखकर करत असतात. अशीच एक योजना आहे, ही योजना आधी २०१० मध्ये इंदिरा गांधी मातृ सहयोग स्कीमच्या रुपात सुरु करण्यात आली होती. या योजनेला मातृत्व सहयोग योजना असं म्हटले जात होते.  २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या योजनेचे नाव बदलून मातृ सहज योजना केले त्यानंतर १ जानेवारीपासून २०१७ मध्ये  पीएम मातृ वंदना योजनेच्या नावाने ही योजना लागू करण्यात आली. 

भारतात प्रत्येक वर्षी गर्मवस्थेत असताना महिलांना अनेक त्रास सहन करावा लागतो आणि  या काळात अनेक  आजार होत असतात. यामुळे प्रत्येक वर्षी ५६ हजार पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होत असतो.  यात सुधारणा होण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली, जेणेकरून अशा परिस्थीत महिलांना मदत मिळावी.  या योजनेतेर्गंत गर्भवती महिलांची प्रसुती झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये दिले जातात.

देशातील अनेक राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.  या योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही जन्मलेल्या बाळाला पोषण व्हावे यासाठी दिली जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्या आपल्यासह नवजात बाळाची काळजी घेऊ शकतील. मातांना चांगल्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी रोख प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.  वृत्तानुसार, जननी सुरक्षा योजनेतून दरवर्षी एक कोटीहून अधिक महिलांना मदत मिळत आहे. सरकार जेएसवाय वर वर्षाकाठी 1600 कोटी रुपये खर्च करत आहे.

English Summary: do you know the government scheme where women get 6 thousand rupees
Published on: 10 July 2020, 06:01 IST